विजातीय विवाहांनी समाज सुधारेल का?


अंक: श्रीसरस्वती दीपावली १९५२ लेखाबद्दल थोडेसे : विविध जातींमध्ये 'बेटी व्यवहार' म्हणजे विवाह झाले, तर जातिभेद नष्ट होतील का? आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आजही देता येत नाही. परंतु ते तसे होतील असं एकेकाळी अनेकांना वाटत होतं. अण्णासाहेब कर्वे यांनी तर ते बोलूनच दाखवलं होतं. आणि मालतीबाई बेडेकरांनी अतिशय मार्मिकरित्या ते तेव्हा खोडून काढलं होतं. परंतु ते खोडून काढतानाही त्यांनी 'व्यवहाराच्या रणगाड्याखाली चेंगरला जाऊ लागला की आपोआप नको असलेलेही तत्त्वज्ञान समाज स्वीकारतो!' असं सांगून ठेवलं होतं. आज आंतरजातीय विवाहाचं प्रमाण सर्वाधिक आहे ते परदेशात नोकरीसाठी गेलेल्या भारतीयांमध्ये आणि त्यात केवळ 'सोय आणि व्यवहारच' पाहिले जातात. मालतीबाईंचं म्हणणं अक्षरशः खरं ठरलं आहे. प्रत्यक्ष भारतात मात्र अजूनही स्थिती फार बदललेली नाही. जवळपास सत्तर वर्षांपूर्वी  मालतीबाईंनी लिहिलेला हा लेख त्यामुळेच आजही मननीय आहे- मालतीबाई बेडेकर तथा विभावरी शिरुरकर या लेखिका आणि समाज चिंतक होत्या. विशेषतः समाजातील, कुटुंबातील स्त्रीच्या स्थानाविषयी त्यांनी सखोल चिंतन व लेखन केले आहे. स्त्रियांच्या हक्कांची सुधारणा(१९३०), हिंदु व्यवहारधर्मशास्त्र (१९३१) हे संशोधनपर लिखाण, कळ्यांचे निःश्वास (१९३३) हा प्रसिद्ध कथासंग्रह, हिंदोळ्यावर (१९३४) ही कांदबरी आणि इतर बरेच लिखाण त्यांनी केले आहे. त्या पूर्वीच्या बाळुताई खरे, विश्राम बेडेकरांशी विवाह केल्यावर मालतीबाई बेडेकर झाल्या. (जन्म १ ऑक्टोबर १९०५, मृत्यू ६मे २००१)  श्रीसरस्वती दीपावली, वर्ष १९५२ या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... अंक- श्रीसरस्वती दीपावल ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चिंतन , समाजकारण , श्रीसरस्वती

प्रतिक्रिया

  1. sumansons

      6 वर्षांपूर्वी

    धागा पन्नाआपल्याच विचाराचास वर्षांपूर्वीच्या कुणाच्यातरी विचाराशी जुळावा हे सुखद आश्चर्य, त्यात ती व्यक्ती मालतीबाई बेडेकर आन सारखी महनीय लेखिका असावी हा दुग्धशर्करा योग. माझ्या बाबतीत हा योग पुनश्च मुळे आला. पुनश्च चे मनःपूर्वक आभार. पुनश्च मधले सर्वच लेख उद्बोधक आणि आदर्श वाटतात.

  2. Shreekant

      6 वर्षांपूर्वी

    सदर लेखाच्या शिर्षकाला शेवटचे दोन परिच्छेद काही अंशी दिलासा देतात असे वाटते



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen