आपली प्रगती आणि आधुनिकता बरीचशी बेगडी आहे पेहेराव बदलला, फर्निचर बदललं, नवीन सुटसुटीत कुटुंबपद्धती आली, फास्ट लाइफ, फास्ट फूड आलं, त्याला लागणाऱ्या संस्था आल्या, पण वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कष्ट करायची तयारी हा आत्मा आला नाही, अशी तक्रार करण्यास आजही जागा आहे...प्रस्तुत लेखात वि. गो. कुलकर्णी यांनी सुरूवातीलाच एसटीडी मुळे संपर्क किती सुलभ झाल्याचे उदाहरण दिले आहे. हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतरच्या अल्पकाळातच संपर्क क्रांतीने आणखी कितीतरी मोठी झेप घेतली. परंतु कोणत्याही क्रांतीचे प्रत्यक्ष विकासात रूपांतर व्हायचे तर माणसाची वृत्ती बदलायला हवी. त्या दिशेने आपण काही प्रगती केली आहे का? वि. गो. कुलकर्णी हे मुळात टीआयएफआर मध्ये शास्त्रज्ञ-संशोधक होते. परंतु वृत्तीने ते समाज चिंतक, शिक्षक आणि ललित लेखक. विज्ञान आणि वैज्ञानिकतेचा प्रसार करण्यासाठी त्यांनी होमीभाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनची स्थापना केली व उत्तम प्रकारे काम केले. अरूण टिकेकर संपादक असताना त्यांनी विगोंना लिहिते केले त्यानंतर विगोंनी सोप्या भाषेत विज्ञान समजावून सांगणारे अनेक लेख लिहिले. विगोेचे १३ जूलै २००२ रोजी निधन झाले. ********** अंक- निवडक कालनिर्णय “हॅलो ! हॅलो ! कोण बोलतंय ? विजया का ? हे पाहा मी अगदी सुखरूप पोचलो. हां, जरा घाटात ट्रॅफिक जॅम होता पण फार खोटी झाली नाही, परागचा पेपर कसा गेला ?” काही कामासाठी मुंबईहून रेठऱ्याला गेलेले रामभाऊ मुक्कामाला पोहोचताच एसटीडीवरून आपल्या पत्नीशी बोलत होते. दहा रुपयांत काम झालं, आणि मुख्य म्हणजे मुक्कामाला पोहोचताच बूथवरून पाच मिनिटांत लाइन मिळाली. सारं संभाषण कसं स्पष्ट ऐकू आलं. एका तपापूर्वी हे मुळी खरंच वाटलं नसतं. ही सारी विज्ञानाची कृपा ! ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
[email protected]
6 वर्षांपूर्वीलेख२००२ च्या आधीचा आजही परिस्थितीत फार फरक नाही बदलाची आशा ठेवूया.
SachinBhoir
6 वर्षांपूर्वीसध्याची स्थिती पाहता देश पुन्हा रिव्हर्स मोड मध्ये जाताना दिसत आहे. वैद्नानिक दृष्टीकोनाचे विचार रुजण्याऐवजी भलत्याच विचारांनी देश प्रेरीत होत आहे. शैक्षणिक, न्याय, राजकारणी संस्थांबद्दल न बोललेच बरे. जे विचार प्रसारीत केले जातात त्यातूनच देश समाज घडत असतो. ह्यात बदल होईल अशी आशा करुया...लेख उत्तमच..!!!
sameergudekar
6 वर्षांपूर्वीअगदी???