लेखाबाबत थोडेसे : लेखक, त्याची कथा आणि वाचकांना ती कथा समजावून सांगणारा समीक्षक यातून साहित्य व्यवहार आकाराला येतो. अनेकांना वाटत असतं की वाचकाला कथा समजावून सांगायची काय गरज आहे? परंतु एखादी कथा ही केवळ कथा नसते तर ती त्या लेखकाच्या एकूण साहित्य संपदेचा भाग असते. त्या लेखकाची विचार करण्याची पद्धत समजल्याशिवाय त्याची कथा कळत नाही. समीक्षक ती समजावून सांगतो. चापेक हा झेक भाषेतील लेखक त्याच्या वैशिष्टयपूर्ण रहस्य-गुन्हेगारी कथांसाठी प्रसिद्ध होता. पाश्चात्य साहित्याचे, चित्रपटांचे आस्वादक,अभ्यासक विजय पाडळकर यांनी चापेकच्या कथांचे विश्लेषण करण्यासाठी त्याची एक कथाच निवडली. ती अनुवादित कथा आणि पाडळकरांनी केलेले तिचे विश्लेषण दोन्ही इथे दिले आहे आणि ते अवाक करणारे आहे. एक वेगळाच अनुभव देणारे आहे... अंतर्नाद अंकात प्रसिद्ध झाला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... ********** अंक :अंतर्नाद The task of the writer is to deepen the mystery rather than to resolve it. -Flannery O’Connor मानवी अस्तित्वाभोवती गुढाचे जे काळोखे आवरण आहे, ते भेदण्याचा, आणि अस्तित्वाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न लेखक करतात. महान कलावंतांना गुढाचे आकर्षण असण्याचे एक कारण म्हणजे अप्राप्याचा शोध हे यांना नेहमीच आव्हान वाटते. अशा लेखकांपैकी करेल चापेक हा विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ झेक लेखक. तो मुख्यत्वेकरून एक विज्ञानकथाकार म्हणून ओळखला जात असला, तरी त्याने विविध प्रकारांचे लेखन केले आहे. त्याने कथा लिहिल्या, नाटके लिहिली, लेख लिहिले, समीक्षालेखनही केले. ‘Robot’ हा शब्द त्यानेच निर्माण केला. मग तो जगभर प्रचलित झाला. पहिल्या महाय ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Siddheshwar
6 वर्षांपूर्वीतुम्ही निवांत बसला आहात,आणि ही कथा वाचून विचारात गढून गेलात,तुमच्या मनासमोर तो न्यायालयातील प्रसंग उभा राहतोय,तुम्ही उभे आहेत तिथेच तटस्थ आणि पाहताय सर्व काही ,भान हरपून असं हरवलं जाणं ,स्वतःच्या तंद्रीत ,हेच सुख असतं ना तसं असेल तर ही कथा वाचून मी अंतर्मुख झालो
asmitaph
6 वर्षांपूर्वीनवीन कथाकाराचा परिचय झाला, धन्यवाद.
asmitaph
6 वर्षांपूर्वीनवीन लेखकाची ओळख झाली. कथा आजही ताजी वाटते.
hpkher
6 वर्षांपूर्वीविचारप्रवर्तक
VinayakP
6 वर्षांपूर्वीखूपच छान. इतक्या प्रतिभाशाली आणि विलक्षण लेखकाची ओळख करून दिल्याबद्दल आभार. चापेक च्या इतर कथाही वाचायला हव्यात..???
asiatic
6 वर्षांपूर्वीछान.