बोध ब्रेग्झिटचा


लेखक देवेंद्र रमेश राक्षे हे सॉफ्टवेअर इंजिनीअर असून काही वर्षे लंडन व आसपास काढल्यानंतर २००९ साली भारतात आले. त्यांचा आजचा हा लेख म्हणजे युरोपमधील आणि विशेषतः इंग्लंडच्या जनमानसावर एका मोठ्या ऐतिहासिक घटनेच्या संदर्भात टाकलेला विवेचक दृष्टीक्षेप आहे. – संपादक मैत्री अनुदिनी********** ब्रेग्झिटबद्दल जगभराचे तज्ञ जे काही भाष्य करीत आहेत ते पाहता “हत्ती आणि चार आंधळे” या गोष्टीची आठवण होते. पायाकडील कोणी म्हणे हा प्राणी खांबासारखा, तर कोणी याला म्हणे सुपासारखा, शेपूट हातात घेणाऱ्यास तो भासतो सापासारखा. मला हसू आले एका लेखाचे, ज्यात ब्रिटिश जनमताचा अमेरिकतील होऊ घातलेल्या निवडणुकीशी बादरायण असे म्हणता येईल असा संबंध लावला. ट्रम्प यांना वाढता पाठिंबा पाहून ब्रिटिश जनमत ढवळून निघाले असे काहीसे मत त्या लेखात मांडले होते. कोणत्याही एक्झिट पोलला दाद न देणारे हे जनमत अगदीच आश्चर्यकारक असे नव्हते. याला कारण युरोपातील राजकीय वादळांचा ब्रिटिश अर्थसत्तेवर होणारा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम ब्रिटिश लोकमानसावर नक्कीच झाला. ग्रीक राज्यकर्त्यांनी आर्थिक (शिस्तीच्या) पातळीवर लाडावून ठेवलेली अनुदानलोभी जनता नि त्या अनुषंगाने ग्रीसने बुडविलेली अमर्याद कर्जे याचा एकूणच युरोपियन अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यास कारणीभूत ठरली. एकट्या जर्मनीच्या जीवावर युरोपियन समुदाय किती पुढे जाणार नि एकंदरीत आणखी किती काळ तग धरून राहणार हा यक्ष प्रश्न समोर असून देखील “पोपट मेला आहे” हे स्पष्ट बोलण्याचे धाडस देखील कोणाचे नाही. जगभरात अतिशय परिपक्व समजल्या जाणाऱ्या ब्रिटिश नागरिकाच्या नजरेतून ही बाब सुटली असेल हे कसे म्हणता येईल? नादारीच्या (दिवाळखोरीच्या) उंबरठ्यावरील ग्रीसला कस ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अर्थकारण , मैत्री अनुदिनी , उद्योगविश्व , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. dhawal

      6 वर्षांपूर्वी

    खूप चांगला लेख. धन्यवाद. ब्रेक्झिट बद्दल थोडं अज्ञान दूर झालं.

  2. arvindpbv

      6 वर्षांपूर्वी

    मूळ भावनिक मुद्द्यावर आधारित पण लिखित कायद्याचा कीस काढून ब्रिटिशांची चाललेली बव्हशी अंतर्गतच लढाई हा राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना एक चांगला आणि दुर्मिळ धडा नव्हे डेमो आहे. अशा दुर्मिळ घटना पहात असताना आपल्या देशात १९४७ ला ५६५ संस्थाने एकत्र करायची (उलटी) लढाई किती अवघड असेल हे ध्यानात येते आणि तत्कालीन नेत्यांबद्दलचा आदर दुणावतो. लेखाबद्दल धन्यवाद.

  3. rakshedevendra

      6 वर्षांपूर्वी

    भूत जबर मोठे —- “बोध ब्रेग्झिटचा” या लेखप्रयोजनामागील माझी धारणा माझ्या न्यूयॉर्क मधील मित्राच्या whatsapp वरील ब्रेग्झिट घटनेचा धसका (panic) घेणारा संदेश मला भावला नाही. कुणालाही घसका घ्यायला लावणारा संदेश पसरविणे मला नाही चांगले वाटत. भीतीदायक वाटते जणू. या भीतीमागील मानसशास्त्रीय वेध घेता मला माझ्या लहानपणीची एक घटना आठवते. मी सहा-सात वर्षांचा असेल त्यावेळी ‘स्कायल्याब’ हा उपग्रह पडणार याच्या धसक्याने उगाच हादरवून सोडले होते. या गोष्टी समजून घेण्याचे माझे वय नव्हते, पण चर्वितचर्वण (चावून चोथा) झालेल्या या घटनेचा शेवट तो उपग्रह हिंदी महासागरात सुखरूप बुडाला तेव्हाच काय तो झाला. तो उपग्रह पडतानाचे सकाळ वृत्तपत्रातील छायाचित्र मला माझ्या वडिलांनी दाखविले ते मला आजही स्पष्टपणे आठवतेय. माझी लेखणी कुणालाही घाबरविणारी नाही, कुणालाही आपल्या विद्वत्तेने घाबरविणे हे लोकांच्या अज्ञानाचा घेतलेला हा एक गैरफायदाच आहे अशी माझी धारणा आहे. धार्मिक बुवाबाजीवर टीका टिपण्णी होते, पण सुशिक्षितांचा प्रसिद्धीचा बुभुक्षित हव्यास यावर लिहिण्याची ही पहिलीच वेळ असावी, निदान तसे माझ्या तरी वाचण्यात नाही. याच विचारांच्या घारणेतून डिसे. १९९९ ते १ जानेवारी २००० पर्यंत मी “वाय टू के” या विषयावर अगदी सामान्यांना समजेल अशा भाषेत दैनिक सकाळ मध्ये एक लेखमाला लिहिली. विषयाचे तत्कालीन गांभीर्य म्हणून ती सकाळच्या सर्व आवृतींमध्ये पहिल्या पानावर घडीच्या वरील अर्ध्या भागात प्रसिद्ध झाली ती देखील “वाय टू के” या विषयावर मी केलेल्या विडंबनासहित. छोट्या छोट्या गोष्टी (यक्ष-युधिष्ठीर, विक्रम-वेताळ ई), एकनाथांचे भारुड (भूत जबर मोठे), स्लोगन्स (ज्ञान-प्रबोधिनीचे ‘आमी बी घडलो – तुमी बी घडाना’, नुमवि चे ‘हाती घ्याल ते तडीस न्याल’ ई) आदी गोष्टीचा वापर करून मला ते लेख खुलवता आले. त्या लेखमालेच्या सरतेशेवटी मला आयुष्यात न विसरता येण्यासारखा पुरस्कार मिळाला तो म्हणजे साक्षात पु ल देशपांडे नि सुनीताबाई देशपांडे या दाम्पत्याची पाठीवर पडलेली थाप. ब्रेग्झिट घटनेसंदर्भात न्यूजमिडिया, सोशलमिडियामध्ये जाणवणारे अज्ञान मला स्वस्थ बसू देईना. त्यातून यात भाग घेणारे स्वयंघोषित तज्ञ भीती कशी वाढवता येईल हेच जणू पहात होते. मला यात पडावे असे काही वाटले नाही, पण whatapp ग्रुप मधील मित्राचा तो panic संदेश मला या लेखाकडे ओढून गेला. माझे लिखाण असेच धीर देणारे, संकटकाळी आधाराकडे मार्ग सुचविणारे, सतत धीर देणारे व प्रेरणादायी व्हावे व्हावे यासाठी माझा प्रयत्न असतो, तुमच्यासारख्या वाचकाच्या प्रतिक्रियांमुळे प्रवाहांपासून एक वेगळी वाटचाल करताना मला किती आधार वाटतो याची तुम्ही कल्पना करावी अन्यथा ‘टाळमृदंग दक्षिणेकडे, आह्मी गातों पश्चिमेकडे’ अशी वेळ माझ्यावर नको यायला. – देवेंद्र रमेश राक्षे, कोथरूड, पुणे



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen