उपहारगृह चालविण्याचा बिकट धंदा...


अंक : पुरुषार्थ, १९५६ लेखाबद्दल थोडेसे : एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस,  तेव्हा हॉटेलमध्ये जेवणे हे उथळपणाचे आणि थिल्लरपणाचे समजले जात होते तेव्हा हॉटेलव्यवसाय करणारांकडे कुठल्या नजरेने पाहिले जात असेल याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. हॉटेलात जेवणाला त्याकाळी शौक म्हटले जायचे आणि लोकांचे हे शौक पुरवणारे अर्थातच तुच्छ समजले जात. या 'बाहेरख्याली'पणाला आज प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. शहरांमधून तर शनिवारी-रविवारी रात्री घरी काही रांधायचे नाही असा नियम आहे की काय असे वाटण्याजोगी स्थिती असते. परंतु उपाहरगृहांना हे स्टेटस प्राप्त होण्यास बरीच वर्षे जावी लागली. सुरूवातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ज्यांनी या व्यवसायासाठी झोकून दिले होते त्यात नरहरी गंगाधर  वीरकर हे गृहस्थ होते. त्यांना पुढे यात यश, सन्मान, मान मरातब सर्वकाही काही मिळत गेले. त्यांची दोन पुस्तकेही प्रसिद्ध झाली. १९५६ साली 'पुरुषार्थ' या मासिकात त्यांनी लिहिलेल्या या लेखातून त्यांचा हा संघर्ष त्यांनी फारच उत्तमरित्या सांगितला होता. ********** माझा व्यावसायिक ध्येयवाद (मूळ शीर्षक) स्वतःजवळ भांडवल नाही, पत्करलेल्या व्यवसायावर मोठ्ठा कर्जाचा बोजा-अशा एक ना दोन, सामान्य माणसाला नाऊमेद करून त्याचे धैर्य खचविणाऱ्या अडचणींचे पर्वतच जणु माझ्यासमोर उभे होते! ‘पुरुषार्थ’ मासिकाच्या ‘आत्मकथा खास अंका’साठी मी माझी आत्मकथा द्यावी अशी विनंती करण्यासाठी त्या मासिकातर्फे माझे स्नेही व अनुभवी वृत्तपत्रव्यवसायी श्री. काशिनाथपंत ताम्हनकर मजकडे आले, त्यावेळी मला आश्चर्य वाटले! कारण हॉटेल, खाणावळ, उपहार-गृह यासारखे व्यवहार करणाऱ्यांकडे आपला समाज अद्यापही तुच्छतेने पहा ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


पुरुषार्थ , उद्योगविश्व , अनुभव कथन

प्रतिक्रिया

  1. rakshedevendra

      6 वर्षांपूर्वी

    लेखक व्युत्पन्न साक्षेपी बहुश्रुत आहे हे लेखाच्या वाक्यागणिक जाणवते. व्यवसायाची निवड, त्यातली धडपड पावलोपावली जाणवते. व्यवसायास पूरक असे व्यावसायिक शिक्षण जरी लेखकाने घेतले नसले तरी अनुभवाच्या विद्यापीठाची डॉक्टरेट मात्र यत्नपूर्वक मिळविलेली दिसते आहे. प्रवाहाविरुद्ध आणि प्रमादाविरुध्द देखील उडी घेऊन स्थिर होण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी पुस्तकरूपे देखील प्रकट केला आहे हे वाचून त्या दोन पुस्तकांच्या बद्दल देखील उत्कंठा जागृत झाली. बहुविध चमूस धन्यवाद.

  2. asmitaph

      6 वर्षांपूर्वी

    माझे वडील या उपहारगृहाचे नेहमी कौतुक करायचे. या लेखात केवढी मॅनेजमेंटची सूत्रे सांगितली आहेत ! Once again thankful to your team for presenting such gems.

  3. किरण भिडे

      6 वर्षांपूर्वी

    https://bahuvidh.com/877/ आहेच लिहिलेला. वाचा आणि अभिप्राय कळवा.

  4. manisha.kale

      6 वर्षांपूर्वी

    जुन्या स्मृती जाग्या झाल्या. आम्ही वीरकर आहार भवन मध्ये शाळेत असताना रविवारी कधी तरी जेवायला जात होतो. लेख छान आहे आवडला.आता गिरगांव मध्ये महाराष्ट्रीयन थाळी मला नाही वाटत कुठे मिळत असेल.

  5. amarsukruta

      6 वर्षांपूर्वी

    छान, किरण भिडे, तुझ्याच बद्दल लिहिलंय अस वाटतंय

  6. TNiranjan

      6 वर्षांपूर्वी

    माझ्या वडिलांनी आयुष्य भर कोकणात हाॅटेल व्यवसाय केला. माझं आणि माझ्या भावंडांच सगळं बालपण ह्या व्यवसायात जणू करपून गेलं. कशीबशी शिक्षणं पूर्ण झाली. ं. पण ह्या व्यवसायाने आम्हाला दुनियादारी चांगलीच शिकवली. वीरकरांनी एका विचाराने हा व्यवसाय फुलवला. तसं काही सर्वच हाॅटेल व्यावसायिकांच्या बाबतीत होत नाही. बरेचसे पोटार्थी स्वरूपांतच व्यवसाय करत असतात. आजकाल हाॅटेलींग व्यवसायाला वलय प्राप्त झाले आहे. पैसे ही भरपूर मिळतात. पण ह्या व्यवसायात कुटूंबियांना प्रचंड दगदग होते. विरकरांप्रमाणे quality राखून पण व्यवसायाची गणीतं सांभाळून यशस्वी होता येईल..... पण टिकून राहण्यासाठी मनाची ताकद हवी.

  7. deepa_ajay

      6 वर्षांपूर्वी

    श्री किरण भिडे तुम्ही सुध्दा तुमचा अनुभव लिहा के सांगावे पुढच्या पिढीतील कोणाला स्फूर्ती मिळेल

  8. purnanand

      6 वर्षांपूर्वी

    जुन्या आठवणी जागृत करणारा अप्रतीम लेख. पूर्वी जेव्हा मराठी नोकरपेशे मंडलींच्या उदरभरणाची आत्यंतिक गरज म्हणून अशा हॉटेलांची नितांत गरज होती . आजच्यासारखी चैन म्हणून हॉटेलात जाणे नसे. 'वेलणकर यांचे वीरकर उपहार गृह' हे गिरगावातील 'कुलकर्णी' 'विनय हेल्थ होम'यांच्या सारखेच प्रसिद्ध हॉटेल. अनेक वेळा कारणपरत्वे जाण्याचा योग आला .आपल्या लेखाने पदार्थांच्या चवीही आठवल्या खुप छान लेख.धन्यवाद !

  9. arkpune

      6 वर्षांपूर्वी

    फारच छान , भाषा त्या काळा प्रमाणे पण ओघावती आहे .

  10. SubhashNaik

      6 वर्षांपूर्वी

    गिरगावातील वीरकर आहार भवन या उपाहारगृहात मई मुंबईत 'महाराष्ट्र टाइम्स' मध्ये असताना (१९७७-१९८२) अनेकदा जेवायला जात असे. अतिशय स्वच्छ व स्वादिष्ट भोजन मिळत असे. 'मौज' व 'मॅजेस्टिक' मध्ये येणारे अनेक नामवंत लेखक 'वीरकर' मध्ये भेटत. श्री. दा. पानवलकरांशी इथेच अनेकदा गप्पा केल्याचे आठवते.लेख त्यांच्या जेवणाप्रमाणेच रुचकर झाला आहे.

  11. smrutijoshi

      6 वर्षांपूर्वी

    आवडला लेखखूपच

  12. asiatic

      6 वर्षांपूर्वी

    उद्बोधक आणि व्यवसायाचे मर्म सांगणारा.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen