बाराशे वर्षांत न सुटलेला हिंदु मुसलमान प्रश्न

श्रीलंकेत बुरख्यावर बंदी घातली जाऊ शकते, मग आपण का नाही घालू शकत? एक प्रश्न. तसे असेल तर मग ‘घुंघट’वरही बंदी आणली पाहिजे. त्या प्रश्नाला एक प्रत्योत्तर! थोडक्यात काय तर ‘हिंदु-मुस्लिम’ हा आजही आपल्या राजकीय, सामाजिक जगण्यातला एक कळीचा प्रश्न आहे. या प्रश्नाशी आपण कधीपासून लढतो आहोत? त्याचा इतिहास काय आहे? या प्रश्नावर शिवाजी महाराजांनी काय उत्तर शोधले होते आणि ते पुढे रेटले गेले नाही त्यामुळे काय झाले? या सर्व प्रश्नांची अतिशय अभ्यासपूर्ण उत्तरे इतिहासपंडित प्रो. त्र्यं. शं. शेजवलकर यांनी या लेखात सत्तर वर्षांपूर्वीच दिली होती. अर्थात ती उत्तरेसुद्धा ‘राजकीय’ ग्रह आणि पूर्वग्रहांना अपवाद नाहीत, परंतु ती निर्विवादपणे अत्यंत महत्वाची आहेत.

शेजवलकर हे चाळीस आणि पन्नासच्या दशकातले महाराष्ट्रातील एक अधिकारी आणि व्युत्पन्न इतिहास संशोधक. शिवाजीचे संपूर्ण चरित्र लिहिण्याचा त्यांचा संकल्प पुरा होऊ शकला नाही हे दुर्दैव, परंतु त्यासाठी त्यांनी केलेली तयारी हे सुद्धा अभ्यासाचे एक मोठे भांडार आहे. पानिपतावरील ग्रंथ लिहिण्याआधी त्यांनी तो संपूर्ण परिसर पायी धुंडाळला होता. सडेतोपणा, मत व्यक्त करण्यातील निर्भिडता, नेमकेपणा ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होती. २८ नोव्हेंबर १९६३ रोजी त्यांचे निधन झाले.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 7 Comments

 1. लेखावरून हेच प्रतित होते कि शिवाजी महाराजांइतका धुरंधर आणि पुढचे भविष्य जाणणारा नेते भारतात झाले असते तर हिंदूयांना जी ग्लानी आली आहे ती कधीच आली नसती.

 2. आत्मनात्मविवेक हे शब्दावडंबर आणि वावदूकपणा होता इथे माझी सहनशक्ती संपली

 3. ACKOOL करानी काहीच पुरावे अथवा मुद्दे न खोडता अभिप्राय लिहिणे,यात त्यांची वैचारिक पातळी समजली. त्यांनी या प्रश्ना चे त्यांच्यामते असलेले उत्तर लिहिणे,ही योग्य टीका झाली असती.त्यामुळे त्यांच्या अभिप्राय ने दुसरी बाजू विचार समजले नाही

 4. विचार करायला लावणारा लेख आहे।

 5. आता मोदींनी नविन ईतिहास लिहिण्याची पुर्व तयारी केली आहे. आपण सर्व भारतियांनी त्यांना सर्वतसर्वतोपरी पाठबळ देणे आवश्यक आहे.
  हर हर मोदी घरघर मोदी.
  जय शिवराय.

 6. शेजवलकर हा काडीमात्र ही किंमत देण्याच्या लायकीचा नव्हे हेच या शब्दबम्बाळ परंतु अर्थहीन लेखातून सिद्ध होत आहे !!

 7. ह्या नंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले .मवाळ धोरण मागे पडून त्याच्या पुढली लांगूलचालन पद्धत अमलात आली . मतांवर नजर ठेवून सर्रास राज्याचा गाडा चालू लागला . ह्यात भविष्यात काही बदल होतीलसं वाटत नाही .शेजवलकरांनी योग्य वेळी धोक्याची सूचना दिली होती हे या लेखावरुन स्पष्ट होते .

Leave a Reply

Close Menu