‘विवाहसमस्या’ सोडविताना…

मासिकातील एक सदर, वाचकांसाठीचा एक उपक्रम म्हणून ‘रोहिणी’ या मासिकाने १९५९ साली विवाहेच्छुक तरूण- तरूणींचे परिचय प्रसिद्ध करायला सुरुवात केली आणि  पुढे या कल्पनेचा एवढा विस्तार झाला की तीच या मासिकाची ओळख बनली. त्यातून मोठा व्यवसाय जन्माला आला आणि इतर अनेकांनीही त्यात प्रवेश केला.  एखादे मासिक काय चमत्कार करु शकते, एखाद्या अभिनव कल्पनेतून  मोठा सामाजिक व्यवसाय कसा उभा राहू शकतो याचा धडाच ‘रोहिणी’ चे संपादक वसंत काणे यांनी साठ वर्षांपूर्वी घालून दिला होता. त्याची सुरूवात कशी झाली ते सांगणारा हा लेख.

ज्या काळी ‘विवाहाची खटपट’ हा अत्यंत खाजगी मामला होता, ज्या काळी मुलीच्या लग्नासाठी ‘जोडे झिजवणे’ एकट्या बापानेच करावे अशी प्रथा होती, त्या काळात सुयोग्य वर-वधू संशोधनाचा विषय सार्वजनिक व्यासपीठावर आणण्याचा प्रयोग  काणे यांनी केला, हे विशेष. हे परिचयाचे सदर  सुरु करताना त्यांनी वाचकांसाठी लिहिलेली भूमिका, अर्थात सदराचे संपादकीय,  त्या संपादकीय लेखाला वाचकांनी पत्रे पाठवून दिलेला प्रतिसाद आणि अगदी सुरुवातीला मासिकाकडे  आलेले विवाहेच्छुकांचे परिचय, हे सगळे आज एकत्र वाचताना लक्षात येते, आपल्या समाजाने किती मोठा प्रवास केला आहे.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has One Comment

  1. एका खूप चांगल्या समाजोपयोगी उपक्रमाबद्दल संपादकाची स्पष्ट भुमिका स्पृहणीय आहे . छोटी सुरुवात असलेला हा उपक्रम उत्तरोत्तर वाढतच गेला आणि त्याचा अनेक लोकांना फायदा झाला . दूरदृष्टी बद्दल श्री काणे ह्यांचे अभिनंदन .

Leave a Reply

Close Menu