कथा, कादंबरी, प्रवासवर्णन असे विविध प्रकार दि.बा. उर्फ दिगंबर बाळकृष्ण मोकाशी यांनी हाताळले. जेमतेम शिक्षण झाल्यावर टाकलेले रेडिओ दुरुस्तीचे दुकान आणि त्यानंतरचा प्रथितयश लेखक म्हणून झालेला प्रवास अशी मोकाशींची दोन अंगे आहेत. 'देव चालले', 'आनंद ओवरी' या त्यांच्या कादंबऱ्या आजही त्यांच्या शैलीतील वैशिष्ट्यांमुळे लोकप्रिय आहेत. साधी, प्रसन्न निवेदन शैली आणि प्रवाही संवाद ही त्यांची खासियत होती. १९४०च्या सुमारास त्यांनी कथालेखनाला प्रारंभ केला. गोष्ट लिहिण्याचा त्यांचा ध्यास आणि त्यासाठीचा पहिला प्रयत्न याची गंमतीदार हकीकत त्यांनी ललितच्या अंकात १९७५ साली लिहिली होती. ती वाचतानाही त्यांच्या नेहमीच्या शैलीचा अनुभव येतो. पुनश्च चा आजचा हा लेख आपण ऐकूही शकता. आगगाडीचा खड्खड् आवाज संथ येत होता. रात्र होती. बाहेर चांदणे होते. मी खिडकीतून चांदण्यात डुबलेले जग बघत होतो. माझ्या मनात येत होतं कविता करणं किंवा कथा लिहिणं किती सोपं आहे. ‘पडले होते रम्य चांदणे’ अशी काव्याला सुरवात करता येईल किंवा ‘चांदण्यातून गाडी धावत होती’ अशी कथेची सुरवात करता येईल. या दोहोंपैकी म्हणाल ते रचता येईल. पण ‘म्हणाल ते रचता येईल’ म्हणत असता पहिल्या ओळीच्या किंवा पहिल्या कडव्याच्या पुढे मला रचा येत नव्हतं. माझ्या ते लक्षात आलं नाही. कथा-कविता करणं सोपं आहे. अगदी फालतू काम आहे. खरं कठीण म्हणजे मोठे निबंधवजा पुस्तक लिहिणं. एखाद गंभीर विषय घेऊन ग्रंथ तयार करणं. लिहिलं तर तसं लिहावं. भुक्कड लिहिण्यात अर्थ नाही. असे तेव्हा माझे विचार होते. त्या वेळी मी सोळाएक वर्षांचा होतो. मी कथा किंवा कविता लिहून पाहिली नव्हती. गं
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
अनुभवकथन
, ललित
, पुनश्च
, दि. बा. मोकाशी
Viraj Londhe
4 वर्षांपूर्वीही कथा ऐकायला खूपच छान वाटलं, तुमच्या ह्या उपक्रमाचे कौतुक व विनंती आणखी लेख ऐकता येतील असे काही करा जेणे करून माझ्यासारख्या वाचण्या पेक्षा ऐकण्या वर प्रेम असणार्या वाचकाना अधिक आनंद मिळेल. त्यासाठी अधिक शुल्क आकारले तरीही आवडेल.
Ajitdixit
6 वर्षांपूर्वीVery good.
manisha.kale
6 वर्षांपूर्वीगोष्टीची जन्मकथा आवडली. पैज लावून कथा लिहणे खूपच धाडसी पाऊल. लेखकाचे लहानपणीचे भावविश्व या लेखातुन समोर उभे राहिले. मस्त.