स्वतंत्र भारतातली पहिली सार्वत्रिक निवडणूक १९५१ साली झाली तेव्हा, मतदान करताना उमेदवार कसा निवडावा या संबंधी केलेले मार्गदर्शन प्रस्तुत लेखात आहे. 'उमेदवार निवडून देताना त्याचे चारित्र्य, लोकहिताची कामगिरी आणि विद्वत्ता ही जर खरोखर कसाला उतरली, तर तो कॉंग्रेसेतर पक्षाचा असला तरी हरकत नाही, असे कॉंग्रेसने जाहीर केलेच आहे.' असे एक वाक्य या लेखात आहे. त्यावरुन, गेल्या ६८ वर्षात काँग्रसने आणि देशानेही राजकीय चारित्र्याबाबत किती आणि कुठल्या दिशेने प्रवास केला आहे ते लक्षात येते. गंमत म्हणजे विंदा करंदीकरांनी 'त्याच त्याच खड्ड्या मधे पुन्हा पुन्हा तोच पाय;जुना माल नवे शिक्के सब घोडे बारा टक्के!' ही आजही जशीच्या तशी लागू होत असलेली कविता १९५२ साली म्हणजे पहिली निवडणूक झाल्या झाल्याच लिहिली होती. कवि द्रष्टा होता असं म्हणावं की, जनता भोळी होती असं म्हणायचं? सदाशिव चिंतामण बापट यांनी १९५१ साली लिहिलेला हा लेख वाचला की हा प्रश्न अस्वस्थ करतो. ********** अंक- पुरुषार्थ, डिसेंबर १९५१ १ - स्वतंत्र भारताच्या निवडणुकी अगदी जवळ येऊन ठेपल्या असल्याने उमेदवार कसा असावा? या संबंधाची माहिती मतदारांना पुरविणे हे कर्तव्यच ठरत नाही काय? मतदारांना मत देणे हा तुमचा हक्कच नसून ते तुमचे कर्तव्यही आहे; हे सतत लक्षात बाळगावयास पाहिजे. भारताच्या पस्तीस कोटी जनसंख्येपैकी सुमारे अठरा कोटी प्रौढ नागरिक स्त्रीपुरुषांना भारतीय घटना समितीने मताधिकार दिलेला आहे, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट होय. एवढी मतदारांची संख्या जगातील कोणत्याही देशात नाही, असे अभिमानाने म्हणता येण्याजोगे आहे. पण हा मतदार संघ पाश्चात्य राष्ट्रांतील नागरिकांप्रमाणे सुशिक्षित (लिहित ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Asha Ranade
6 वर्षांपूर्वीThe most important word other than Congress!!! It was not party but the candidate. Now the scenario is changed single good person and handful of sincere persons are helpless if the entire party is not actively supporting the good cause. Here the voter is in dilemma whether to consider only party or inefficient candidate????
deepa_ajay
6 वर्षांपूर्वीउत्तर थोडं मोठं होतय ...... फारा वर्षांपूर्वी कै नरसिंह रावा ना प्रश्न विचारला होता तुमच्या मते कोण निवडुन येईल त्यांनी फार मार्मिक उत्तर दिले एकदा अमेरिकेत एका मतदाराला प्रश्न विचारला तू कोणाला मत देणार त्यानी सांगितल काल रात्री माझ्याकडे repblic चा उमेदवार येऊन गेला त्यांनी सांगितले तू मला मत देशील तर मी तुला $ 10 देईन, थोड्या वेळाने democrt चा उमेदवार आला त्याने सांगितले की तू मला मत देशील तर मी तुला $ 100 देईन, पत्रकाराने विचारले मग तू काय ठरवलं आहेस तर मतदार म्हणाला रिपब्लिक कारण he is less corput