दि. ०८ -०१ -२०१९ जयभीम पाटिल ! बरं जय महाराष्ट़ घालतो, रागाउ नका गडया! जय महाराष्ट़ चललं, पन त्यो नमस्कार नगं! त्यो बामनाचा शब्द झाला ! जात लपवायची असतीय त्यांना ! …. हे बामन लई हुषार ! लगीच दाखला देतेत, “ जीमी कार्टर भारतात आल्ता तवा त्यो नमस्ते शब्द शिकला आन जपाननंतर भारतातच एवडया नम्रपणे अभिवादन करण्याची पद्धत हाय आस मनला होता” जाउंद्या! तुमच आमच जमलं गडया ! ऑ ? कसं मन्जे ? अवो, आता तुमी बी रिजर्वेशनवाले आन् आमी बी रिजर्वेशनवाले ! टेका, टेका जरा ! आँग् अश्शी ! तूमाला मानलं गडया पाटिल ! रक्त नाय्- पात नाय्, काठी नाय्- लाठी नाय्, मयताला निगाल्यावानी तुमी रस्त्यावर चालले काय आन् रिजर्वेशन् पदरात ! ? ? मायला आमच्या नशिबी संगर्ष हायेच् ! साद्या नामांतराच्या येळेला काय कमी काठ्या खाल्लया आमच्या पोरवांनी ? जाती वाचक शिव्या घालू घालू काठ्या घातल्या पोलीसांनी ! …….. त्यांना बी काय दोष द्यायचा ? हया सत्ताधाऱ्यांला “नाही” मनायला काय जातय् , इतं पोलीसांचा पीन्ना पडतूय, मोर्चे आवरू आवरु ! … बरं नामांतर होवून झालं काय? ? ? ….. तर त्या इनीवर्सिटीच्या डिग्रयाच् “ अस्पृश्य” झाल्या ! नाही?..नाय् पटायच् तूमाला ! ..आन् समजायच् बी नाय् , आन् समजून घ्यायच बी नाय् कुनाला ! जाउंद्या ! … त्यो इतिहास झाला ! … आन् आता वादग्रस्त मुद्दे काडायचे बी नाय्त ! .. तूमाला मानलं गडया ! नीस्ती सैन्याची जमवा – जमव काय सुरू केली , शत्रू शरण ! … आमाला आनंद झाला ! … मनापास्न आनंद झाला ! कारण ? ….? आता तुमी बी रिजर्वेशनवाले आन् आमी बी रिजर्वेशनवाले ! .. आमच्या “बाबानं” मनलंच् हुतं, रिजर्वेशनमुळ समानता ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Rdesai
6 वर्षांपूर्वीखरे आहे .म्हणून तर जातीसाठी माती खावी ही म्हण तयार झाली आहे .
bookworm
6 वर्षांपूर्वीखरं तर जातीचा संदर्भ आल्याशिवाय भारतात समाजकारण होऊ शकत नाही ही खरी शोकांतिका आहे. ४७ ते १९ पुलाखालून बरेच पाणी गेलं पण गेली नाही ती जात...
sumansons
6 वर्षांपूर्वीधन्यवाद!
sumansons
6 वर्षांपूर्वीधन्यवाद!
6 वर्षांपूर्वी
नमस्ते... नमः हस्ते
Makarand_Joshi
6 वर्षांपूर्वीभारीच आहे.