१९२१ ते १९३९ या काळात नाशिक येथे वास्तव्य केलेले डॉ. शंकराचार्य कुर्तकोटी हे महान साधक होतेच, परंतु लौकिकात राहून पारमार्थिक जीवन अत्यंत प्रगत करून घेतलेली ती थोर विभूती होती. त्यांचे निधन झाल्यावर लिहिलेल्या या लेखात चिं. त्र्यं. केंघे यांनी शंकराचार्य कुर्तकोटी यांचे पांडित्य, स्पष्टवक्तेपणा आणि स्वभाव वैशिष्ट्ये यांचा घेतेलेला हा उत्कट परामर्ष रविवार ता. २९ ऑक्टोबर १९६७ ला दुपारी ३ वाजता नाशिक येथे एका अलौकिक एकाकी जीवनाचा अन्त झाला. त्यावेळी श्रीशंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांनी आपल्या मर्त्य कलेवराचा त्याग केला. नाशिक-पंचवटीतील रस्ते-कृष्ण मन्दिराचा तिसरा मजला आता सुना झाला. विविध क्षेत्रातील हजारो व्यक्तींचे स्फूर्तिस्थान नि विश्रांतिस्थान कायमचे लुप्त झाले. श्रीशंकराचार्यांच्या सत्तेचाळीस वर्षांच्या वास्तव्यात इथे कितीतरी राष्ट्रीय आणि आन्तरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना घडून आल्या. शेकडो व्यक्तींना शुद्धीकरणाने हिन्दुधर्माचे द्वार खुले झाले, कितीतरी राष्ट्रवादी भूमिगतांना राष्ट्रीय लढ्याच्या काळात आसरा मिळाला, अनेक थोर पुढाऱ्यांना स्फूर्ती आणि मार्गदर्शन लाभले. संस्कृतच्या आणि तत्त्वज्ञानाच्या असंख्य विद्यार्थ्यांना अमोल शिक्षण लाभले. नि आध्यात्मिक साधकांना दीक्षा आणि साधना मिळाली. विविध प्रकारची नियतकालिके – येथून प्रसिद्ध झाली. पुष्कळांच्या विद्येचा, कलेचा आणि कार्याचा यथायोग्य गौरव झाला. हिन्दुधर्माला कालानुरूप विश्वव्यापी वळण देण्याचा फार मोठा प्रयत्न येथूनच झाला. शांकर मठाग्नालयालाही नवीन स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला. परंतु प्रभावी काळाने हे सर्व स्मृतिशेष करून टाकले आहे. श्रींचा आणि माझा परिचय झाला तेव्हा श्री प्रत्यक्ष क्रियाशील ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .