अंक : ललित, ऑक्टोबर १९७३ लेखाबद्दल थोडेसे: लेखक लिहितो तेंव्हा त्याच्या लेखनामागे केवळ त्याला मिळालेले सृजनाचे वरदान असते का? अर्थातच नाही. कारण लेखक होणे ही फार पुढली गोष्ट झाली, लेखक आधी घडत असतो आणि आपण घडतो आहोत याचा त्याला स्वतःला आणि त्याच्या परिघातील इतर लोकांनाही पत्ता नसतो. या घडण्यातूनच मग तो अचानक कधीतरी प्रकटतो. आधी स्वतःसमोर मग लोकांसमोर. तर गंगाधर गाडगीळांनी (२५ ऑगस्ट १९२३ - १५ सप्टेंबर २००८) त्यांच्या अशाच घडण्याची आणि प्रकट होण्याची त्यांची बहारदार गोष्ट या लेखात सांगितली आहे. लक्ष्मी आणि सरस्वती सुखानं एकत्र नांदावी, तसे अर्थशास्त्र आणि ललित साहित्य हे दोन गुण गाडगीळांच्या ठायी होते. अर्थशास्त्रात आवश्यक असलेली 'हा सूर्य, हा जयद्रथ' वृत्ती त्यांनी ललित लेखनात येऊ दिली नाही आणि साहित्यातील हळवेपणाचा स्पर्श कधी आर्थिक विषयावरील लेखनाला येऊ दिला नाही. लेखक म्हणून गाडगीळांनी कथा, कादंबरी, प्रवास वर्णन, विनोदी साहित्य, बालसाहित्य असे नाना प्रकार हाताळले, परंतु नवकथांचे आणि मराठी साहित्यातील नवतेच्या एका प्रवाहाचे श्रेय त्यांना प्रामुख्याने दिले जाते .कडू आणि गोड , तलावातील चांदणे इत्यादी कथासंग्रह. लिलीचे फूल ही कादंबरी,दुर्दम्य ही लोकमान्य टिळकांवरील कादंबरी, मुंगीचे महाभारत हे आत्मचरित्र आणि बंडू ही खुमासदार व्यक्तिरेखा अशा विपुल साहित्यातून गाडगीळ आपल्याला भेटत आले आहेत.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Chandrakant Chandratre
4 वर्षांपूर्वीखुपच छान
deshmukhmohan0@gmail.com
5 वर्षांपूर्वीखूपच प्रेरणादायी
सुरेश कुलकर्णी
5 वर्षांपूर्वीजोशी सर,खरंच तुम्ही मी पत्रकार कसा झालो ?हे लिहा . सु.मा.कुलकर्णी, नांदेड.
arvindjoshi
5 वर्षांपूर्वीहा लेख वाचून मला, मी पत्रकार कसा झालो, हे लिहिण्याची ऊर्मी जागी झाली आहे.
ppkchemicals@gmail.com
5 वर्षांपूर्वीछान वेगळा लेख
dspkop@gmail.com
5 वर्षांपूर्वीखूप छान प्रेरणादायी
rashmipp
5 वर्षांपूर्वीसहज, सोपा, सुरेख
mbdeshmukh
5 वर्षांपूर्वीखूपच छान लेख आहे. लेखनात किती सहजता आहे .
mailimaye@gmail.com
5 वर्षांपूर्वीAtyant sundar !
atmaram-jagdale
5 वर्षांपूर्वी