त्या घटनेला काही वर्षे लोटली. अशा प्रकृतीच्या आणि प्रवृत्तीच्या व्यक्तिंचे भारतात पुढे जे काही होते तेच रामभाऊंचे झाले. लोक रामभाऊंना आता प.पू.पळवे महाराज म्हणूनच ओळखतात. पळणे आणि पळवणे यामागे किती गहन अध्यात्मिक अर्थ दडलेला आहे हे लोकांच्या हळूहळू म्हणजे आस्तेकदम लक्षात आले आणि मग लोक त्यांना पळवे महाराज म्हणू लागले. दहीहंडीच्या दिवशी होणारे त्यांचे भाषण ऐकायला लोक आता तिकिट काढून येतात. रोजच्या जगण्यातील लहान-सहान प्रश्नांवर ते आपल्या भाषणात असे काही तोडगे सुचवतात की त्या तोडग्यांची त्रिखंडात चर्चा होते. तसंही तोडगा या शब्दातील तोड ही पहिली दोन अक्षरं त्यांना आधीपासूनच प्रिय होती. त्या दोन अक्षरांसोबत पाणी हा शब्द जोडूनच ते गुजराण करत होते. जेहत्ते कालाच्या ठायी एकेकाळी ते केवळ महाजनांचे चालक होते परंतु काळाच्या ओघात आता ते बहुजनांचे पालक म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. ते जेव्हा चालक होते तेव्हा त्यांच्या मालकांना सतत कुठेतरी जाण्याची, कुठेतरी पोचण्याची घाई असे. त्यामुळे ते सतत “रामभाऊ पळवा जरा” असं म्हणत असंत. तेव्हापासूनच त्यांच्या मनात ‘पळवा’ या शब्दानं घर केलं होतं. पळणे, पळवणे हेच आपले आयुष्य आहे असे त्यांना तेव्हापासूनच वाटत होते. आज आपण जे काही आहोत ते केवळ त्याकाळी आपण धनी सांगेल त्याप्रमाणे पळवत होतो म्हणूनच आहोत, हे त्यांना स्वतःच्या मनाशी चांगलेच ठावूक आहे. त्यांनी तर आपल्या आश्रमातील भिंतीवर सुविचारच लिहून ठेवलेला आहे- " पळवल्याने होत आहे रे, आधी पळवलेची पाहिजे." आपल्या मालकाला सतत कुठेतरी पोचवून पोचवून त्यांच्यात एवढा आत्मविश्वास निर्माण झाला की पुढे कालौघात ते सतत कुणालातरी पोचवण्याच्या कामातच व्यस्त झाले.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Kiran Joshi
4 वर्षांपूर्वीमस्त चिमटे आणि शाब्दिक टपल्या!
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीखुपचं छान लेख - उपरोध उपहास नर्म विनोद यामुळे लेख वाचनीय झाला आहे .
purnanand
7 वर्षांपूर्वीजे काही व्यक्त करायचे आहे ते अतिशय छान उपरोधिकपणे लेखात उतरलेय..खूप छान.
TINGDU
7 वर्षांपूर्वीनुकत्याच घडलेल्या प्रसंगावर व उधळलेल्या मुक्ताफळावर केलेली तुरंत टिप्पणी. छान. आवडली.
sanjupandit
7 वर्षांपूर्वीनेहमीईतकी मजा नाही आली . हा खुपच खुमासदार विषय होता आणखी मजा येवु शकली असती
mugdhabhide
7 वर्षांपूर्वीखुसखुशीत खुमासदार आणि बोचरा काय combination आहे
प्रमोद बेजकर
7 वर्षांपूर्वीखुसखुशीत तरीही बोचरा,विनोदी तरीही अंतर्मुख करणारा हा लेख तंबींच्या नावलौकीकास शोभून दिसणारा आहे.
gadiyarabhay
7 वर्षांपूर्वीनेहमीप्रमाणे नर्म विनोदी आणि बोचरा
Nishikant
7 वर्षांपूर्वीझकास!
Makarand
7 वर्षांपूर्वीमस्तच उपरोधाची तळपती तलवार
asmitaph
7 वर्षांपूर्वीsuperb . ( as usual ) !!!!!
arya
7 वर्षांपूर्वीनर्म विनोदी खुसखुशीत अन उपहासगर्भ लेख आहे. तंबींच्या इतर लेखांसारखाच टवटवीत, वाचनीय... धन्यवाद !
sureshjohari
7 वर्षांपूर्वीअप्रतिम आणि मार्मिक लेख आहे हा
shriramclinic
7 वर्षांपूर्वीएक नंबर
roksha57
7 वर्षांपूर्वीसुरेख आणि मार्मिक लेख
[email protected]
7 वर्षांपूर्वीवाह!!! खूपच छान लेख. वाचून मजा आली
Namratadholekadu
7 वर्षांपूर्वीपुन्हा एक अप्रतिम शाब्दिक फटकेबाजी . वाचनानंद देणारा खूपच छान लेख.