‘१८’ म्हणे ‘१९’ ला....


काळरुपी अंड्याच्या कवचाला तडा गेला आणि त्यातून २०१९चा जन्म होऊ लागला. २०१८च्या ३६५ दिवसांच्या आयुष्यातील केवळ काही घटका उरल्या होत्या. २०१९ने अंड्याच्या फुटलेल्या कवचातून बाहेर पाहात २०१८ला विचारलं, ‘काळाच्या उदरात गडप होण्याआधी चार शहाणपणाच्या गोष्टी सांगशील की नाही? तसं तर माझ्याकडे चार्ज देताना तुला तुझा भूतकाळ माझ्या हवाली करायचा आहेच, पण माहिती देणं आणि ज्ञान देणं यातला फरक मला कळतो. गुगलता आलं की सगळी माहिती मिळते, मात्र ज्ञान देणारं तंत्रज्ञान जन्माला आलेलं नाही कारण कृत्रिम बुद्धिमत्ता आली तरी अद्याप कृत्रिम अनुभव कुणाला तयार करता आलेला नाही.’ १८ नं १९कडे प्रेमानं पाहिलं आणि म्हणाला, ‘जन्माला येण्याआधीच तुझ्यात एवढं शहाणपण आहे हे पाहून मला बरं वाटलं, कारण तुझ्या ३६५ दिवसांत लोकांच्या शहाणपणाचा कसं लागणार आहे.’ ‘तुझ्या या पहिल्या वाक्यालाच राजकीय संदर्भांचा वास येतो आहे मला.’ ‘बरोब्बर ओळखलंस. तू तोंडातून एखादं राजकीय वाक्य काढलं रे काढलं की समोरचा माणूस त्याच्या खिशातला रबरी शिक्का काढून तुझ्या कपाळावर मारतो आणि तुझा गट कुठला ते ठरवून टाकतो. त्यातही हल्ली आपल्याला दिसतं तेच अंतिम सत्य आहे आणि इतरांनी त्यांना दिसतं ते सत्य सांगूच नये, झाकून ठेवावं, अशा मतांची माणसं संख्येनं वाढली आहेत. ज्याला आपलं पटत नाही तो आपल्या विरोधात आहे, हे नवं तत्वज्ञान आहे.’

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


प्रासंगिक , तंबी दुराई

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen