डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत सुवर्णपदक मिळालेल्या ओजस चौगुले याने काय भन्नाट कल्पना लढवली आहे बघा. ज्यूस सेन्टरमध्ये फळांच्या सालीचा जो कचरा निर्माण होतो, त्यापासून कुंडी तयार केली त्याने. वाचा त्याच्या प्रयोगाबद्दल-
मित्रांनो, आज मी तुम्हांला माझ्या एका अनोख्या प्रवासाविषयी सांगणार आहे. प्रवास तर आपण सगळेजणच करतो, पण लक्षात राहतात तेच प्रवास, ज्याच्या प्रत्येक टप्प्याची आपण मनापासून मजा घेतलेली असते ! असाच माझा एक ‘सुवर्ण’प्रवास म्हणजे ‘डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षे’त सुवर्णपदक मिळविण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन केलेल्या तयारीचा प्रवास !! हा प्रवास माझ्यासाठी खूपच संस्मरणीय ठरला, कारण या प्रवासाने मला माझ्या सुवर्णपदकाच्या ध्येयापर्यंत पोहोचवले. मी सहावीतच आहे, तरीदेखील सहावी, सातवी आणि आठवी या तिन्ही वर्षांचा विज्ञानाचा अभ्यासक्रम, तीन महिन्यांत पूर्ण करून सप्टेंबर २०१८ मध्ये मी लेखी परीक्षा दिली. माझ्या विज्ञान शिक्षिका सरिताताई आणि निवेदिताताई यांनी तीन महिन्यांत माझ्याकडून खूपच चांगली तयारी करून घेतली होती. महाराष्ट्रातून ६३,००० मुलांमधून उत्तीर्ण झालेल्या ५००० मुलांमध्ये मी निवडला गेलो आणि मग खरी परीक्षा सुरू झाली ती माझ्या आणि आई-बाबांच्याही कष्टाची आणि सहनशक्तीची! कारण पुढची फेरी असते ती प्रात्यक्षिक फेरी. या फेरीसाठीही, शाळेत अमितदादा तर मराठी विज्ञान परिषदेत संगीताताई आणि घरी आई-बाबा यांच्या मदतीने, अनेक प्रयोग केले. भरपूर वाचन, बारकाईने निरीक्षण यामुळे माझी प्रात्यक्षिक परीक्षाही खूपच छान झाली आणि शेवटच्या ‘मुलाखत आणि प्रकल्प’ या फेरीसाठी निवडल्या गेलेल्या ५०० मुलांत माझीही वर्णी लागली. प्रात्यक्षिक फेरीचा ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
avthite
6 वर्षांपूर्वीअप्रतिम प्रयत्न!! ओजस, अजून एक प्रयत्न कर.. एक वर्ष घे या कुंड्या कशा प्रकारे वातावरणाशी जुळवून घेतात ते पहा.. आणि काही आवश्यक वाटल्यास बदल करून त्यांना बाजारपेठेत आण.. आज अत्यंत गरज आहे निसर्गाला आपण मदत करण्याची ..