आपल्या आर्याला झालंय तरी काय ?

वयम्    प्रवीण दवणे    2019-05-03 10:00:08   

बाल्कनीतून दिसणारे पक्षी, आसपासचे प्राणी यांच्याविषयी आर्याला कुतूहल वाटे. तिला त्यांच्याविषयी ममत्व वाटे. एकदा तर तिच्या भूतदयेचा (प्राणिप्रेमाचा) कहरच झाला...

बाल्कनीतल्या बागेत फुललेल्या मोग-यावर एखादी पिवळी पाकोळी येऊन बसली की, आर्याला प्रश्न पडे- नेमकी कुठून आली असेल ही? खिडकीतल्या काऊला दूधभाताचा घास ठेवताना एक काऊ येई नि स्वत: न खाता दोन-चार मित्रांना का बोलावतो- आणि स्वत: मात्र का पाहात राहतो हे तिला कळेना. एका मनीनं मँव केलं की, लपलेली दुसरी मनी उडी मारून कशी टपकते याचं आर्याला कोडं वाटू लागलं होतं. कुठल्याही शाळेत न जाणा-या ह्या हिरव्या जगातल्या रंगीत मंडळींचीही एक भाषा असावी असं तिला हळूहळू कळू लागलं होतं. बागेत गेल्यावर तिथली ‘फुलं तोडू नयेत.’ हे तिला बागेतली पाटी न वाचताच कळू लागलं होतं. आपल्याला धक्का लागला की जशी वेदना होते, तशीच पाना-फुलांनाही होत असावी, याची आर्याला जाणीव होऊ लागली होती. दिवाळीच्या सुट्टीत पेरलेल्या पुस्तकांच्या बिया जणू उन्हाळ्याच्या सुट्टीत उगवल्या होत्या. आर्यामधला एक निराळाच बदल तिच्या आई-बाबांना जाणवू लागला होता. दोघांनाही त्याची गंमत वाटे नि कुतूहलही. कामावरून दमून आलेल्या आई-बाबांना मनातलं हे सर्व आर्या सांगायची. आर्याची बाहेरच्या निसर्गाकडे, पशू-पक्ष्यांकडे बघण्याची दृष्टीच बदलत चालली आहे, नि ती अधिक तरल होत आहे, याचा दोघांना आनंदच होई. तिच्या ह्या विस्तारत जाणा-या नव्या जगात आई-बाबा हेच तिचे खरे सवंगडी झाले होते. मायेनं लाड करणारा बाबा तिची मस्त फिरकीही घेई. ‘काय-आज काय बोलली खारुताई?’ ‘बोलली ना? आर् ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen