गब्बूचा चेहरा विचित्र आहे. त्याचं डोकं म्हणजे त्याला अगदी दुस-याच मुलाचं चिकटवल्यासारखं. हात, पाय चांगले गोरे गोंडस. मात्र डोळे, नाक, कपाळ, ओठ, कान काहीच कुठल्या प्रमाणात नाही... आधी विचित्र वाटलेला हा मुलगा बघता बघता आमचा मित्र झाला...
शुभंकर त्या बंगल्यात बॉल शोधायला गेला, त्याला २०-२५ मिनिटं झाली. त्याची वाट पाहत, या पायावर, त्या पायावर उभं राहून कंटाळा आला. एकेकाने फेऱ्या मारून पाहणी करून झाली. तिथे आलेला नवा माणूस भांडकुदळ असला, तर फुटलेल्या कुंड्यांवरून कटकट करेल, पण काही ऐकू येईना. शुभ्या एकटा नको पडायला म्हणून शेवटी आम्ही सगळेच निघालो. एकमेकांच्या छातीतली धडधड ऐकू येण्याइतकी मोठी झाली. बाहेर दारात पोहोचलो तर आमच्यासारखीच अर्धी चड्डी घातलेले एक काका शुभंकरच्या खांद्यावर हात टाकून बाहेर आले. शुभंकरच्या हातात एक बॉक्स दिसत होता. त्याचा चेहरा समुद्रमंथनातून अमृताचा कुंभ मिळाल्यासारखा आनंदित. आम्ही सगळ्यांनी एकमेकांकडे प्रश्रार्थक नजरेने पाहिले. एवढ्यात त्या काकांनीच हसून आम्हांला सगळ्यांना आत बोलावले. आम्ही जरा लाजून, संकोचून आत गेलो आणि सोफ्यापाशीच दाटीवाटीने उभे राहिलो. “शुभंकर, हे सगळे तुझे मित्र ना? त्यांच्याशी पण गब्बूची ओळख करून दे.” ते आतून चाकाची खुर्ची लोटत बाहेर घेऊन आले. त्यात एक मुलगा बसलेला. हाच असणार गब्बू. गुबगुबीत दिसत होता. शुभंकर म्हणाला, “गब्बू, हे सगळे माझे मित्र– धनू, बिट्टू, गौरव, असीम, ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .