क्रिकेट मचमधली उत्कंठा, टीममधले ताण, खेळाडूंच्या वृत्तीनुसार बदलणारा गेम या वातावरणात घेऊन जाणारी ही रोमहर्षक गोष्ट !
“कॅप्टन, कस्सला भारी ‘वन-हेंडेड’ कॅच घेतलायस तू थर्डमेनला!” “नाहीतर आज सुजय जोशी घेऊनच जाणार होता संपूर्ण मॅच!” “ती सिक्स तू वाचवलीस म्हणूनच जिंकलो आपण! काय फिनिश होता मॅचचा! फक्त तीन रन्सने जिंकलोय आपण!” शारदा विद्यामंदिरच्या अंडर-१४ क्रिकेट टीमचे काही मेम्बर त्यांची ‘व्हिक्टरी’ सेलिब्रेट करत जिमखान्याबाहेर येत होते. शाळांचं नवीन वर्षं सुरू झाल्यानंतर शाळांमधून क्रिकेटचाही नवीन सीझन तितक्याच जोमाने सुरू झाला होता. तीन दिवसांच्या या मॅचचा आजचा निर्णायक दिवस होता. शारदा विद्यामंदिरने पहिली बॅटींग (batting) करत २५६ ऑल-आउट असा स्कोअर कसाबसा उभा केला होता. त्यांचा कुठलाही फलंदाज मोठा स्कोअर बनवू शकला नव्हता. समोरच्या के. ई. एस. शाळेने प्रत्युत्तर देत पहिल्या इनिंग्सला ३५० बनवले होते. १०० हून कमी लीड असून देखील शारदा विद्यामंदिर दुसऱ्या इनिंग्सला फक्त २०० रन्सच बनवू शकली. तेव्हाही त्यांचे फलंदाज सूर पकडू शकले नव्हते. पण तिसऱ्या दिवशी मात्र त्यांना मिळालेल्या जेमतेम लीडमध्ये, गोलंदाजीच्या जोरावर ते मॅच जिंकले होते. या सर्व टीम मेंबर्सच्या कौतुकाचा वर्षाव ऐकताना टीमचा कॅप्टन रोहन मात्र अगदीच गप्प होता. जिमखान्याच्या बाहेर आल्यावर कोणाशीच काहीही न बोलता त्याचे बाबा स्कूटर पार्क करून उभे असलेल्या दिशेने तो निमूटपणे निघून गेला. त्याच्या बाबांचं ऑफिस जिमखान्याजवळच असल्यामुळे ते बऱ्याचदा रोहनला मॅचनंतर घ्यायला यायचे. “छान मॅच झालेली दिसतेय!” बाबा रोहनची क्रिकेट कीट स्कूटरच्या कॅरी ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .