कडक शेफकोट घातलेला शेफ आपल्याला भुरळ पडतो. मोठमोठ्या हॉटेलचा थाटमाट आपल्याला आवडून जातो. आणि आपल्यालाही वाटते, या क्षेत्रात आपण जावे. या चकचकीत दुनियेतही कष्ट आहेत. शिवाय बाकीचे जग मज्जा करत असते, तेव्हा ही मंडळी खूप बिझी असतात...
“नमस्कार दोस्तों, आज हम जो बनाने जा रहे हैं उस डिश का नाम हैं मॅक्रोनी और ये हैं इटली की बहुत ही पॉप्युलर डिश! आइये देखतें हैं इसे बनाने के लिए हमें कौन कौनसी सामग्री की जरुरत होगी...” अशी सुरुवात असणाऱ्या बऱ्याच कार्यक्रमांची टीव्हीवर रेलचेल असते. कच्च्या वस्तूंपासून सुरुवात करून, त्यांच्यावर होणाऱ्या विविध प्रक्रिया, शिजवण्याच्या विविध कृती, शेवटी तो पदार्थ कसा दिसतो, कशाबरोबर खायचा, कसा सर्व्ह करायचा, त्यात होत जाणारी स्थित्यंतरे हे सगळे अगदी नीट, प्रत्यक्ष ‘याची देही याची डोळा’ बघायला मिळते टीव्हीवर. शिवाय कडक शेफकोट घातलेला तो शेफ किती सहजतेने ते सगळं करत असतो!! त्याच्या थाटामाटाची आपल्यावर चांगलीच छाप पडते आणि आपणही तसं बनायचं ठरवूनच टाकतो! [caption id="attachment_10711" align="alignright" width="300"] मैत्रेयी लोवलेकर[/caption] chef चा उच्चार ‘शेफ’ असा आहे. मूळ फ्रेंच शब्द chef म्हणजे chief- मुख्य. किचनचा (स्वयंपाकघराचा) मुख्य तो chef. शेफने त्याच्या कामाचे व्यावसायिक / तांत्रिक शिक्षण घेतलेले असते. त्याला नुसताच स्वयंपाक येतो असे नाही, तर विविध भाज्या, डाळी व कडधान्ये, दूध आणि दुग्धजन् ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
vinayakbapat
6 वर्षांपूर्वीअत्यंत सुंदर कमी वेळात जास्त व मुलभुत माहिती दिली आहे. धन्यवाद.