जय ‘शक्ति’मान!

वयम्    डॉ. बाळ फोंडके    2019-05-14 11:00:57   

आपण जमीन, पाणी, हवेतच नव्हे तर अवकाशतही युद्ध लढण्यास समर्थ आहोत, हे भारताने २७ मार्च २०१९ रोजी सिद्ध केले. या प्रकल्पाचे नाव ‘मिशन शक्ती’. A-Sat नावाचे उपग्रह-विरोधी क्षेपणास्त्र आपल्या संशोधकांनी विकसित केले. अवकाशात पृथ्वीपासून ३०० किलोमीटर अंतरावर ‘लो अर्थ ऑर्बिट’मध्ये असलेल्या उपग्रहाचा भारताच्या A-Sat क्षेपणास्त्राने अवकाशात पृथ्वीपासून ३०० किलोमीटर अंतरावर लो अर्थ ऑर्बिटमध्ये असलेल्या उपग्रहाचा भारताच्या A-Sat क्षेपणास्त्राने केवळ तीन मिनिटांत अचूक वेध घेतला. आतापर्यंत अशी कामगिरी फक्त अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनीच करून दाखवली आहे. आपण जगात चौथे! यात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा (डीआरडीओ) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा (इस्रो) सिंहाचा वाटा आहे. हे कसे काय शक्य होते संशोधकांना, ते समजून घेऊया.

नाना बातम्या पाहत बसले होते. अंतराळात भ्रमण करणारं उपग्रह नष्ट करणारं एक नवीन क्षेपणास्त्र आपल्या वैज्ञानिकांनी तयार केल्याची माहिती पंतप्रधान देशाला देत होते. तोच उघड्या दारातून एखादं क्षेपणास्त्र घुसावं तशी चिंगीची टोळी त्यांच्या घरात घुसली. ''नाना, नाना, हा चंदू बघा काय सांगतोय. आपल्या एका उपग्रहावर हल्ला झालाय आणि तो मोडून पडलाय!” चिंगीनं जोरजोरात विचारलं. ते करतानाही तिला दम लागला होता. ''खरंच आहे ते.” ''पण का? तो उपग्रह तिथं नेऊन ठेवण्यासाठी किती खर्च येतो, किती जणांना मेहनत करावी लागते. आणि त्याचे आता आपणच तुकडे तुकडे करायचे. कशासाठी नाना?” मिंटीनं कळकळीनं विचारलं. ''मला एक सांगा, तुम्ही अलीकडच्या काही बातम्या वाचल्या असतीलच. छुपे कॅमेरे लावून आपली नको तसली छायाचित्रं काही गुंड घेत असतात. सम ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen