दक्षिण महासागरात सील्स व देवमाशांची कत्तल करत करत शिकारी मंडळी अधिकाधिक दक्षिण दिशेला सरकू लागली. त्यातून नवीन भूभागाचा शोध लागत गेला... भारतीय संशोधन मोहिमेतील डॉक्टर म्हणून या खंडावर जाऊन, वर्षभर राहून आलेल्या डॉ. मधुबाला चिंचाळकर यांनी आपल्यासाठी लिहिलेली ही लेखमाला. आपल्या पृथ्वीच्या तळाशी असलेला अंटार्क्टिका हा सातवा खंड. काही ग्रीक तत्त्ववेत्त्यांनी खूप वर्षांपूर्वी कल्पना केली होती की, उत्तरेला आर्क्टिक समुद्र असून त्याच्याभोवताली जमीन आहे; तर दक्षिणेला, दक्षिण ध्रुवावर जमीन आणि त्याच्याभोवती समुद्र असला पाहिजे. त्यांच्या मते, पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी हे आवश्यकच होते, परंतु ही केवळ एक कल्पनाच होती. १७७३ साली सर जेम्स कूक या धाडसी खलाशाला पृथ्वीवरील ह्या सातव्या खंडाचा शोध लागला. पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावर जमीन आहे, हे सर्वांना समजले. या खंडाला ‘अंटार्क्टिका’ हे नाव दिले. कारण उत्तर ध्रुवावरून दिसणारे सप्तर्षी (आर्कटाईक) येथे दृष्टीस पडत नाहीत. उत्तरेच्या (आर्क्टिक) विरुद्ध (अँटी) असा हा आपला अंटार्क्टिक! हा खंड चहूबाजूंनी दक्षिण महासागराने वेढलेला आहे. हिवाळ्यात अंटार्क्टिका खंडालगतच्या समुद्राचे पाणी गोठते. खंडाचे आकारमान जवळपास दुप्पट होते. येथील तापमान उन्हाळ्यातसुद्धा -५ ते -१० अंश सेल्शियस असल्यामुळे हा बर्फ पूर्णपणे वितळतच नाही. त्याचे मोठमोठे तुकडे तयार होतात. त्याला पॅक आईस (Pack Ice) असे म्हणतात. हे खूप महाकाय अस ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
pradnyakulkarni
5 वर्षांपूर्वीमस्त लेख!??