बदललेल्या बाबांना ‘थँक यू!’  

वयम्    शुभदा चौकर    2019-06-05 14:22:27   

पूर्वीच्या काळी 'बाबा' म्हणजे- दचकून, घाबरून राहायचं, त्यांच्या शब्दाबाहेर जायचं नाही. त्यांच्याविषयी आदरायुक्त भीती सतत असायची... पण सध्या याचं भीती वाटणाऱ्या बाबांचं चित्रं आता बदलत चाललंय. या बदलत चाललेल्या बाबाविषयीचं हे संपादकीय- शिबिरात मुलांना सोडायला-आणायला आलेल्या बाबा मंडळींकडे बघताना मजा वाटत होती. किती बदललेत हे ‘बाबा’? बाबांना बाय बाय म्हणताना जडावलेल्या पायांनी तिथून निघालेले प्रज्ञेशचे बाबा, घ्यायला आलेल्या बाबांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना काय सांगू आणि काय नको असे वाटलेल्या मुक्ताचे व तिच्या बाबांचे मेतकूट, बाबांशी टाळ्या देत गप्पा मारणारा सोहम यांच्याकडे बघताना जाणवत होते की ‘बाबा’ बदलले आहेत. मध्यंतरी एक बाबा सांगत होता की, दर रविवारी तो त्याच्या लहानग्या मुलीला तेलमालिश करून आंघोळ घालतो. ते काम हळुवारपणे करताना तो बाळाच्या मऊशार स्पर्शाने सुखावतो. स्पर्शाच्या उबेतून बाप-लेक नाते जास्त प्रेमळ होते, असे वाटले त्याला. आणि हा आनंद फक्त सुटीच्या दिवशी घेता येतो याची खंत वाटत होती त्याला. प्रथमच शाळेत पाऊल रडत रडत टाकणाऱ्या लाडक्या पिल्लाचा हात धरून त्याला सोडताना, डबडबलेल्या डोळ्यांचे बाबा बालवाडीच्या आवारात हमखास दिसतात. पालकसभेला येऊन मुलांच्या जडणघडणीबद्दल उत्सुकतेने समजून घेणारे बाबाही दिसतात. आपल्या मुलांना आत्मविश्वासाने सांभाळणारे, त्यांच्याशी मोकळ्या गप्पा मारणारे, मुलांच्या भावभावनांशी समरस होणारे बाबा हे चित्र अनेक घरांत दिसते.  मुलांच्या संगोपनात सहभागी होण्याचा रसरशीत अनुभव घ्यायचा असतो त्यांना. तुम्हा मुलांचं बालपण मुठीतल्या वाळूसारख असतं. बघताबघता तुम्ही मोठे होता आणि निसटून जातात ते क्षण. तुमच्या बालपणचे म ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen