पु. ल. देशपांडे यांनी साहित्य, संगीत, कला आणि प्रेमळ व उदार स्वभाव यांच्या मदतीनं जग सुंदर केलं. तुम्ही त्यांची पुस्तकं वाचली असतील. त्यांच्या प्रयोगांचे व्हिडिओ पाहिले असतील. १२ जून २००० साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला. सारा महाराष्ट्र या वर्षी त्यांची जन्मशताब्दी साजरी करत आहे. समजून घेऊया त्यांच्याबद्दल-
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. खूप म्हणजे किती, माहितेय अगदी ९५-१०० वर्षांपूर्वीची! मुंबईच्या जोगेश्वरी उपनगरात ‘सरस्वतीबाग’ नावाच्या एका वसाहतीत काही कुटुंबं राहात होती. त्या वसाहतीतल्या लोकांची एकमेकांशी छान मैत्री होती. तिथे नेहमी वेगवेगळे कार्यक्रम होत. लहान मुलं-मोठी माणसं, सारीच त्यात भाग घेत. त्यातील एका कुटुंबात एक ४-५ वर्षांचा छान गोंडस मुलगा होता. एकदा जवळच्या मंदिरात कार्यक्रम होता. त्या मुलाला त्याच्या आजोबांनी अभिमन्यूबद्दलचं छोटं भाषण लिहून दिलं. तयारी पक्की करून घेतली. सभा भरली. सभेत टेबलावर उभं राहून त्या मुलाने हातवारे करत भाषण करायला सुरुवात केली. अभिमन्यूच्या शौर्याचं वर्णन करताना त्याला जोर आला आणि त्याचा तो आवेश पाहून समोरचे लोक कौतुकाने हसू लागले. ते पाहून तो मुलगा पटकन् म्हणाला, ‘लढाई अभिमन्यूने केली. मी काही इथे लढायला आलो नाही. मी भाषण करतोय.’ ही त्याची मनची वाक्यं ऐकल्यावर लोक अधिकच हसू लागले. ते पाहून तो आपलं पुढचं भाषण विसरला, पण वेळ मारून नेण्यासाठी काहीतरी बोललं पाहिजे म्हणून म्हणाला, ‘आता माझी दूध पिण्याची वेळ झाली आहे. मी जातो.’ वयाच्या पाचव्या वर्षी केलेले हे पहिलं जाहीर भाषण, त्यात दाखवलेलं प्रसंगावधान, केलेला अभिनय हे गुण ज्याच्याजवळ जन्मजात होते, पुढच्य ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .