झेपावे चंद्राकडे...

वयम्    श्रीराम शिधये    2019-06-09 10:04:35   

११ वर्षांपूर्वी, म्हणजे सन २००८च्या ऑक्टोबर महिन्यात, भारताचं चांद्रयान-१ हे यान चंद्राच्या दिशेनं झेपावलं होतं.  जुलै २०१९मध्ये, भारत पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करणार आहे. त्याबद्दल- चंद्राचा अधिक अभ्यास करण्यासाठी आपलं ३८०० किलो वजनाचं चांद्रयान-२ चंद्राच्या दिशेनं झेपावणार आहे. ते यान चंद्राभोवती फिरणारा ऑर्बिटर, चंद्रावर उतरणारा विक्रम नावाचा लँडर आणि चांद्रभूमीवर फिरून माहिती जमा करणारा ‘प्रज्ञान’ नावाचा रोव्हर (फिरती गाडी) घेऊन आपला चंद्राच्या दिशेनं प्रवास सुरू करेल. यान चंद्राच्या कक्षेत पोचलं आणि चंद्रापासून १०० किमी अंतरावरून चंद्राभोवती फिरू लागलं की, ऑर्बिटरपासून विक्रम हा लँडर अलग होईल आणि प्रज्ञान या रोव्हरला घेऊन चंद्राच्या दक्षिण गोलार्धात उतरेल. दक्षिण ध्रुवापासून ६०० किमी अंतरावर विक्रम हा लँडर उतरेल. तिथे उतरल्यानंतर त्यातून दोन उपकरणांनी सज्ज असलेला रोव्हर किंवा फिरती गाडी चंद्राच्या भूमीवर उतरेल. आपलं काम करण्यासाठी या गाडीवर सौरबॅटर्‍या आहेत. त्यातून मिळणार्‍या ऊर्जेचा वापर करत ही गाडी आपली नियोजित कामं चंद्राच्या भूमीवर करू लागेल. आपली ही चांद्रमोहीम दि ९ ते १६ जुलै या दरम्यान सुरू होईल. हा अंक तुमच्या हाती पडेल, तोपर्यंत कदाचित ही तारीख निश्चित झाली असेल. चांद्रयानानं पृथ्वीचा निरोप घेऊन अवकाशात झेप घेतल्यापासून त्याला चंद्राच्या कक्षेत पोचण्यासाठी ३५ ते ४५ दिवस लागतील. हा मजकूर तयार होत होता, तेव्हा चंद्रावर उतरण्याची तारीख दि. ६ सप्टेंबर असेल, असं जाहीर करण्यात आलं होतं. ती कदाचित बदलूही शकेल. खरंतर ही मोहीम याच वर्षाच्या दि. ३ जानेवारी ते १६ फेब्रुवारीच्या दरम्यान सुरू करण्याची योजना होती. परंतु नंतर एप्रिल महिन्य ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen