ऋत्विजला आता पॉकेटमनी हवाच होता. तो अगदी हटून बसला होता. त्याची आईही काही कमी नाही. तिने त्याचा हट्ट पूर्ण करायचा असं म्हटलंय, पण काही अटींवर !
पिगी बँकमध्ये आई-बाबांनी कितीही पैसे टाकले ना तरी ते खरं तर कमीच वाटतात. मोठ्यांच्या वॉलेटमध्ये पैसे असतात तसं काहीसं हवंसं वाटू लागतं. ऐटीत स्वतःच्या खिशातून पैसे काढून द्यायचे, रिक्षाला किंवा दुकानात. स्वतःला हवं ते खरेदी करायचं त्या पैशांमधून, अशी इच्छा होऊ लागते. तसं ऋत्विजला पण वाटू लागलेलं. ऋत्विजचा दादा गेलाय आता दहावीत आणि ऋत्विज गेलाय सहावीत. त्यामुळे दादाकडे आई-बाबा काही अतिरिक्त पैसे देऊन ठेवायला लागलेत. क्लासला जायला, कधी सायकलचं टायर पंक्चर झालं, कधी दोन लागोपाठ क्लास असतील आणि डबा न नेल्याने भूक लागली तर.. त्याचा हिशोबही तो देतो. मग कधी तो भाजी आणि दूधही आणून देतो त्याच पैशांमधून. दर महिन्याला ऋत्विजच्या पिगी बँकमध्येही पैसे टाकले जातात. कारण पैसे खर्च करायचे असतील तेव्हा दादा किंवा आजोबा घरात असतातच. ऋत्विजला आता पॉकेटमनी हवासा झालाय. ऋत्विजची आई याला जुळ्याचं दुखणं म्हणते. अर्थात दादा आणि ऋत्विजच्या वयात सहा वर्षांचं अंतर आहे, हे ऋत्विज लक्षात घेत नाही. पण या दुखण्यावर उपाय तर शोधायला लागणार होता. त्या दिवशीच आईवर रुसून दुपारभर चिडून बसला होता ऋत्विज. “तू मला पैसे देत नाहीस. राधा, स्वीटी, पश्यंत, अद्वैत सगळ्यांना पॉकेटमनी मिळतो. तू फक्त दादाचे लाड करतेस.’’ ऋत्विजच्या आईने राधा, स्वीटी, पश्यंत, अद्वैत सगळ्यांच्या आयांना फोन करून तुम्ही खरंच एवढे पैसे देता का मुलांना, असं विचारलं. त्यांच्या आयांनीही आम्ही घरात नसतो, मग कधी मुलांना बाहेरून खायला मागवावंसं वाटतं, त्यामुळे ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .