डास चावला की खाज का सुटते? 


डास चावतो तेव्हा नकळतच आपण खाजवायला लागतो. खरं तर डासाचं तोंडसुद्धा पटकन दिसत नाही. मग हा डास चावतो म्हणजे नक्की काय करतो आणि त्यामुळे खाज कशी काय येते?  डास चावतो तेव्हा त्याची लाळ आपल्या त्वचेमध्ये टोचली जाते. तो पदार्थ परका असल्याचं आपल्या पेशींना जाणवलं की, तिथे झुंजार पांढऱ्या रक्तपेशी (White Cells) धावून येतात. हिस्टमीन नावाचं एक लढाऊ रसायन तिथे ओतलं जातं. ते हिस्टमीन त्या भागातल्या खास कंड-मज्जातंतूंना (Nerves)  जागं करतं. प्रतिक्षिप्त क्रियेने आपण त्या जागी खाजवतो. कंड-मज्जातंतू ताबडतोब मेंदूतली धोक्याची घंटा वाजवतात, डास चावल्याचं आपल्याला कळतं आणि आपण डासाचा बंदोबस्त करतो. खाजवल्यामुळे काय साधतं खाजवल्यामुळे सौम्य वेदना होतात. वेदनांची सूचना मेंदूला पोचवणं अधिक महत्त्वाचं! कंड-मज्जातंतू हा वेदना वाहून नेणाऱ्या मज्जातंतूंचाच एक प्रकार असावा, असं आता शास्त्रज्ञांना खात्रीने वाटतं आहे. त्या मज्जातंतू वेदनांची खबर पोचवण्यात गुंगले की, काही काळ खाजेचा विसर पडतो. पण तो आराम तात्पुरताच असतो. डासांची लाळ, मुंग्यांचं विष, अळू-सुरण यांच्यातले अणकुचीदार सूक्ष्म स्फटिक, सुरवंटाचे हुळहुळे केस वगैरे गोष्टी कंड-मज्जातंतूना चिडवतात. तशा साध्या खाजेला चिंचेचं पाणी, चंदनाचा लेप लावून आराम पडतो. म्हातारपणाच्या कोरड्या त्वचेला साय, तेल लावून खाज कमी करता येते. गजकर्ण-नायटा, खरूज किंवा साधं घामोळं देखील त्वचेमध्ये पांढऱ्या रक्तपेशींना आणि हिस्टमीनला आमंत्रण देतात आणि कंड सुटते. मलमं, पावडर लावून, औषधं पोटात घेऊन त्वचा पुन्हा निकोप झाली की ती खाज थांबते. अ‍ॅलर्जीची खाज नेमके इलाज करून शमवता येते. अफूसारखी अंम ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen