‘पॅन्स लॅबिरीन्थ’ (२००६) या सिनेमात आवडण्यासारख्या त्यात अनेक गोष्टी आहेत. मात्र हा मुलांसाठी बनवलेला चित्रपट आहे, असं नाही. वेगळ्याच धाटणीचा हा चित्रपटात आहे तरी काय आणि तो का बघावा... वाचा या चित्रपटाविषयी- गिआर्मो डेल टोरो या स्पॅनिश दिग्दर्शकाचा ‘पॅन्स लॅबिरीन्थ’ (२००६) या सिनेमाचं रेकमेन्डेशन मी तुमच्यापेक्षा तुमच्या पालकांवर सोडणार आहे. हा चित्रपट मुलांनी पाहावा असं मला नेहमीच वाटतं, मी स्वत: तो मुलांबरोबर बसून पाहिलेला आहे आणि मुलांना आवडण्यासारख्या त्यात अनेक गोष्टी आहेत. मात्र तो मुलांसाठी बनवलेला चित्रपट आहे, असं नाही. त्याचा आशय हा प्रामुख्याने मोठ्या प्रेक्षकाला अधिक प्रमाणात पोचेल असा असला; तरी त्याच्या गोष्टीतली काव्यमयता, फॅन्टसीचा वापर आणि लहान, दहा-बारा वर्षांची त्याची साहसी नायिका ऑफेलिआ या गोष्टी मुलांना आवडतील. ही एका बाजूने अगदी ‘कोणे एके काळी’ प्रकारची मुलांची गोष्ट आहे. त्यात जादू आहे, पऱ्या आहेत, राजे-राण्या आहेत, राजकन्या आहेत आणि मुख्य म्हणजे राक्षसही आहेत. १९४४च्या युद्धग्रस्त स्पेनमधे वाढणाऱ्या ऑफेलिआ या मुलीच्या आयुष्याला अचानक फुटणारा फाटा, आणि त्यातून तिच्यापुढे उलगडलेलं एक नवं विश्व, यांची ही कहाणी आहे. मात्र दुसऱ्या बाजूने ही कथा आहे ती तिथल्या जुलमी फ्रॅन्कोइस्ट राजवटीने आपल्याला असलेला विरोध मोडून काढण्यासाठी चालविलेल्या प्रयत्नांची, सामान्य माणसांवर होणाऱ्या अत्याचारांची आणि त्या विरोधात उभ्या ठाकलेल्या काही मोजक्या लोकांची. छोटी ऑफेलिआ (इवाना बकेरो) आपल्याला पहिल्यांदा भेटते, ती आपल्या गरोदर आईबरोबर (आरिआड्ना गिल), कॅप्टन विडाल (सर्गी लोपेज)च्या युद्धछावणीवर जात असताना ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .