काम नव्हे, आनंदयात्रा!

वयम्    प्राची मोकाशी    2019-06-11 01:00:18   

आपण अनेकविध व्यवसायांची नावं ऐकतो. त्यातील व्यक्तींना भेटतो. त्यातली काही क्षेत्रं आपल्याला भुरळ पाडतात. पण त्या क्षेत्रात नेमकं काय काम असतं, हे जाणून घेण्यासाठी ही मालिका. यांत आपल्याला भेटतील एकेक व्यावसायिक, जे आपल्याला त्यांच्या कामाबद्दल सांगतील. ही मालिका वाचली की, तुम्हांला तुमच्या करिअरचे मार्ग ठरवायला मदत होईल. या भागात वाचा- टेक्निकल रायटर आणि इंस्ट्रक्शनल डिझायनर नेमके काय काम करतो ते !

मित्र-मैत्रिणींनो, आपण एखादं उपकरण म्हणजे मायक्रोवेव्ह, मिक्सर जेव्हा घरी विकत आणतो तेव्हा सर्वांत प्रथम काय करतो? आईकडे कुठलातरी नवीन पदार्थ बनवून खायला घालण्याची भुणभुण लावतो.. हे तर झालंच! पण आपल्यापैकी काही अभ्यासू, वृत्तीने चिकित्सक मंडळी त्या उपकरणाबरोबर येणारी इंस्ट्रक्शनल किंवा ऑपरेशनल मॅन्युअल (मार्गदर्शक पुस्तक) नक्कीच वाचून बघत असतील. उपकरणाची विविध कार्ये समजून घेण्याचा प्रयत्न करत असतील. मायक्रोवेव्हमध्ये एखादा खाद्यपदार्थ बनवण्यासाठी मायक्रोवेव्हचं तापमान कसं सेट करायचं, किती वेळासाठी सेट करायचं हे सारं इंस्ट्रक्शनल मॅन्युअलच्या मदतीने समजून घेऊन पास्ता, कप केक असे यम्मी पदार्थ झक्कासपैकी करत असतील! हे झालं पुस्तकरूपांतल्या मदतीबद्दल! हल्ली ‘ऑन-लाइन’ हेल्प मिळण्याची सोयही असते. ही इंस्ट्रक्शनल मॅन्युअल्स (सूचना पुस्तिका) अथवा ऑन-लाइन हेल्प तयार करण्यासाठी काही खास लेखक असतात, ज्यांना टेक्निकल रायटर्स किंवा टेक्निकल कम्युनिकेटर्स असं म्हणतात. एका वाक्यात सांगायचं तर टेक्निकल रायटर्स हे ‘प्रॉडक्ट डॉक्युमेंटेशन’ करणारे लेखक असतात. टेक्निकल रायटिंग हे तसं आय.टी. क्षेत्रामधलं थोडं आगळं क्षेत्र आहे. विख्यात शा ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen