गुण # मार्क

वयम्    शुभदा चौकर    2019-07-04 12:15:17   

 गुण या शब्दाचा खराखुरा अर्थ सांगणारे  जुलै महिन्यातील हे संपादकीय- “कल्पना करा की आपल्या मनात एखादी नवी कल्पना आली की कानातून एक बुडबुडा किंवा फुगा बाहेर येतोय... खरोखर असे झाले तर आपल्या कानातून कितीतरी फुगे बाहेर येत राहतील ना? आपल्या सर्वांच्या मनात कल्पनांचे असंख्य बुडबुडे निर्माण होत असतात- कधी छोटे, कधी मोठे. आपण ते बुडबुडे विरण्याच्या आत त्याकडे लक्ष दिले ना, तर आपल्या मनात नवे विचार रुंजी घालतात. आपल्याला काहीतरी साकारण्याची स्फूर्ती देतात. पाहा, नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या मंडळींनी त्यांच्या मनातील बुडबुड्याचं काय केलंय ते!” ...स्वीडनच्या ‘नोबेल प्राईझ म्युझियम’मध्ये शिरताच या आशयाचा एक इंग्रजीत लिहिलेला फलक वाचायला मिळाला. त्यांनी पुढे असेही म्हटले होते- “या म्युझियममध्ये अनेक नोबेल विजेत्यांच्या शोधांची, कामांची माहिती आहे. त्यांच्या कामांनी माणसांचे जगणे सुंदर केले आहे. हे सारे बघून, वाचून झाल्यावर तुम्हीही जरा कोपऱ्यात शांत बसा आणि विचार करा की तुम्ही काय करू इच्छिता! आणि मनात रुजवा ते विचार. करा पाठलाग त्या विचारांचा. आणि मग तुमच्याही हातून एखादे चांगले काम नक्की घडेल... हे नोबेल विजेते तुम्हांला ही प्रेरणा देत राहोत!” त्या म्युझियममध्ये नोबेल विजेत्यांचे कर्तृत्व समजून घेत असताना जाणवत होते की, त्यांनी त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी अपार कष्ट घेतले होते; झपाटल्यासारखे काम केले होते. रक्तगटाचा शोध असो, वा पेनिसिलीनचा वा DNAचा, निग्रो लोकांवरचे अत्याचार जगासमोर आणण्याचे काम असो वा युद्ध बंद करण्यासाठी दिलेला लढा असो, प्रत्येकाचे काम अफाट आहे. त्यांच्या कल्पना त्यांनी स्वप्न म्हणून डोळ्यांसमोर ठेवल्या. त्याच त्यांच्या प्रे ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen