अवकाश-मोहिमांनी दिलेल्या ‘गिफ्ट’!

वयम्    श्रीराम शिधये    2019-08-07 11:16:59   

वायरलेस हेडसेटस्, व्हॅक्युम क्लिनर, माऊस, चरे न पडणारी काच अशा अनेक गोष्टी म्हणजे अवकाश- मोहिमांनी मानवाला दिलेलं ‘गिफ्ट’ आहे! चांद्रयान-२ ला शुभेच्छा देतानाच आपल्याला नवीन भेटी काय मिळणार, याची आपण उत्सुकतेनं वाट पाहूया-

चांद्रयान-२ अवकाशात झेप घेण्याची तयारी सुरू असतानाच भारत अवकाश स्थानक उभारणार असल्याचंही जाहीर झालं होतं. त्याहीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'गगनयान' मोहिमेचीही घोषणा केली होती. भारताच्या या दोन महत्त्वाकांक्षी मोहिमा आहेत.  त्याकोणत्याही अवकाश-मोहिमेचे आनुषंगिक फायदे बरेच असतात. अशा मोहिमांसाठी वापरण्यात आलेलं तंत्रज्ञान एकंदर समाजासाठी फार उपयुक्त ठरतं. अर्थात अवकाश-मोहिमांसाठी वापरलेलं तंत्रज्ञान जसंच्या तसं वापरता येतंच असं नाही. मात्रमध्ये बदल करून ते तंत्रज्ञान समाजाच्या भल्यासाठी उपयोगात आणता येतं. याची असंख्य उदाहरणं आहेत. अमेरिकेच्या ‘नासा’नं १९७६ सालापासून ते सन २०१६पर्यंत, म्हणजे ४१ वर्षांमध्ये, अवकाश-मोहिमांसाठी विकसित झालेल्या तंत्रज्ञानाचे कसे आणि किती फायदे आतापर्यंत झाले आहेत, ते जाहीर केलं आहे. ‘नासा’च्या म्हणण्यानुसार या काळात समाजोपयोगी अशी एकंदर १९२० उत्पादनं बाजारपेठेत दाखल झाली. ती अर्थातच विविध क्षेत्रांमध्ये उपयोगी पडणारी आहेत. यातली काही ठळक उदाहरणं आता आपण पाहूया-  Ø  तुम्ही सगळेच जण आता कॉम्प्युटर वापरता. गेल्या काही वर्षांमध्ये या कॉम्प्युटरचा आकार किती बदलला! आता छोटेखानी, अगदी सहजपणे उचलून इकडून तिकडे ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ज्ञानरंजन , बालसाहित्य , विज्ञान- तंत्रज्ञान

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen