सिनेमा म्हणजे टाईमपास, करमणूक. परंतु अलीकडे अर्थपूर्ण सिनेमांकडे प्रेक्षक वळताना दिसतात. अशाच एका अर्थपूर्ण असलेल्या 'विहीर' या चित्रपटाचा आस्वाद-
आपल्याला लहानपणीच सांगितलं जातं की, सिनेमा म्हणजे टाईमपास. करमणूक. तो पाहताना विचार वगैरे करायला लागत नाही. फक्त वेळ मात्र चांगला जायला हवा. त्यात आपल्याला आवडते हिरो हिरॉइन असले, तर फारच चांगलं. किंवा मग विनोद म्हणा, स्टंट्स म्हणा, व्हिजुअल इफेक्ट्स म्हणा! हे सगळं जर त्यात असेल तर आपले तिकिटाचे पैसे वसूल समजायचे. गंमत म्हणजे, पुस्तकं वाचतानाही आपण त्यातून गोष्टीची अपेक्षा करतो. पण त्यांच्याकडून केवळ टाईमपास ही अपेक्षा नसते. त्यातून काही नवं सांगितलं जाईल, कुठलातरी संदेश मिळेल, काही वेगळा विचार मांडला जाईल असं सांगितलं जातं. आणि तसं जे पुस्तक करु शकेल, ते इतरांपेक्षा अधिक चांगलं मानलं जातं. खरं म्हणजे हा नियम सर्वच माध्यमांना का लागू नये? जी गोष्ट पुस्तकं करू शकतात ती टेलिव्हिजन किंवा सिनेमा का करु शकणार नाही? या आपल्या चित्रपटांकडून असलेल्या अपेक्षा या आपल्या चित्रपटांमधून चांगली, केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसलेली निर्मिती होण्याच्या मार्गातला अडथळा ठरल्या आहेत. जो सिनेमा काही नवं करू पाहतो, विचार देऊ पहातो, तो आपल्यासाठी नाहीच अशी समजूत आपल्या प्रेक्षकाची झाली आहे, आणि त्यामुळे अशा अर्थपूर्ण सिनेमांकडे पाठ फिरवून केवळ मनोरंजन असलेल्या चित्रपटांची आपल्याकडे चलती आहे. असं असूनही काही दिग्दर्शक न डगमगता हे काम सातत्याने करताना दिसतात. उमेश कुलकर्णी हे त्यातलं एक नाव. आणि त्याचा २००९सालचा चित्रपट ‘विहीर’ हा अशाच विचार मांडणाऱ्या ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
ajitpatankar
6 वर्षांपूर्वीविहीर सिनेमा २००९ साली प्रदर्शित झाला होता. आता पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची शक्यता नाही. त्यामुळे चित्रपटाची मांडणी आणि तांत्रिक बाजू थोडक्यात सांगून, चित्रपटाची कथा अधिक सविस्तरपणे सांगितली असती तर बरं झालं असतं.