जाऽऽऽऽम्भईऽऽ


आळस आला, कंटाळा आला किंवा झोप आली की लगेच जाऽऽऽऽम्भईऽऽ येते. जाऽऽऽऽम्भईऽऽ काढतेवेळी आपण मोठं तोंड उघडतो. पण ही जाऽऽऽऽम्भईऽऽ येते कशामुळे ?

“म्व्हांऽऽआंऽऽआंऽऽआंऽम्हंऽऽहंऽऽऽऽह्” पाकिस्तानच्या कॅप्टनने ऐन भारत-पाकिस्तान सामन्याच्या मध्यावर जांभई दिली. फारच चेष्टा झाली त्याची! जांभई आहेच तशी बदनाम! अनेक देशांत, अनेक संस्कृतींमध्ये, अगदी पूर्वीपासूनच जांभई हे झोपेचं, निरुत्साहाचं, कंटाळ्याचं लक्षण समजलं जातं. चारचौघांत, मोठ्यांसमोर जांभई द्यायची नसते. तरीही ती येतेच. पोटातल्या बाळाला सहाव्या महिन्यापासून जांभई येते. पालीसरड्यांपासून घुबडांपर्यंत सगळे पाठीचा कणा असलेले प्राणी जांभई देतात. अलीकडेच या जांभईचा अभ्यास झाला. त्याला ‘कॅझ्मॉलॉजी’ म्हणजे ‘दरीचा, खाईचा अभ्यास’ म्हणतात! अर्धशिशीची किंवा आकडीची नांदी, मेंदूचे इतर काही आजार यांत एका दिवशी २७-२८ वेळाहून अधिक जांभया येतात. फारच जबडा ताणून जांभई दिली तर जबड्याचा सांधा सटकतो, तर कधी तिथल्या मज्जातंतूंनाही दुखापत होऊ शकते. पण ते सोडलं तर बदनाम जांभई बहुगुणी असते. निरुद्योगी, पेंगुळलेल्या मेंदूमध्ये अनेक झोपाळू रसायनं जमा होतात. त्यामुळे मेंदूच्या वेगवेगळ्या भागांकडून एकजुटीने उपाययोजना आखली जाते. मग जबडा ताणून, नाकातोंडावाटे मोठ्ठा प्रदीर्घ श्वास आत ओढून मग लांब निःश्वासावाटे हवा बाहेर टाकली जाते. त्याच्यात मेंदूचे अनेक भाग हातभार लावतात. छातीचे, घशाचे, टाळूचे स्नायू, श्वासपटल आणि इतरही स्नायू भाग घेतात. सोबतच मानेचे स ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


आरोग्य , ज्ञानरंजन , बालसाहित्य

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen