नवा, मस्त, भन्नाट असा अनुभव घेताना आपण अनेकवेळा भारावून जातो. ही गोष्ट महत्त्वाची आहे. मात्र भारावलेपणामध्ये गुंतायला नको. भारावल्या मनामध्ये एक ऊर्जा असते. ती पुढच्या अभ्यासासाठी आणि मुख्य म्हणजे चिकित्सक विचारासाठी वापरायला हवी. आपला ‘कस’ वाढवण्याची ही थिअरी समजून घ्या! इयत्ता तिसरी किंवा चौथीच्या पुस्तकात ‘आपल्या जिल्ह्यात होणारी पिके’ असा एक विषय होता. मी राहात होतो जळगावला. ‘काळी कसदार जमीन’ असा उल्लेख वारंवार यायचा. ‘काळी कसदार’ या शब्दांमधली लय मस्त होती. मी त्यातच गुंतलो होतो, तर एका चौकस मित्राने गुरुजींना (‘सर’ होण्याआधीचा काळ) विचारलं, “कस म्हणजे नेमके काय गुरुजी?” गुरुजी थबकले. पण तेही मुळात शेतकरी कुटुंबातलेच होते. क्षणभर विचार करून म्हणाले, “जमिनीचा कस म्हणजे जमिनीचे अंगभूत गुण आणि दोषसुद्धा..... आपल्याकडे पाऊस माफक म्हणून जमिनीने पाणी धरून ठेवायला हवं. पिकाच्या मुळांभोवती स्वत:चा घट्ट आधार निर्माण करायला हवा. खत पडणार मातीमध्ये. तिथून ते रोपापर्यंत पोहोचवायला हवं. रोपाच्या वाढीला मदत करणाऱ्या कृमी-कीटकांना आश्रय द्यायला हवा.” गुरुजी अजूनही बोलले असते, तर मी मध्येच म्हणालो, “म्हणजे मातीकडून हे सगळं नाही झालं तर छान पाऊस पडला, उत्तम बियाणे लावली, नैसर्गिक खते घातली तरी येणाऱ्या पिकाचा....” मी अडखळलो. गुरुजी म्हणाले, “तर येणा-या पिकाचा वाण काही अव्वल असणार नाही.” येणाऱ्या पिकाच्या दर्जाबद्दलचे ते संभाषण आज जवळजवळ ५० वर्षांनतर माझ्या मनासमोर जागे झाले. मी आताच्या क्षणाला निवांत, एकटा बसलोय एका गर्द जंगलात. सभोवती आहेत फुललेली झाडे, मोठे वृक्ष.... मधूनच पावसाचा शिडकावा, मधूनच किरणांची चाह ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .