केमिकल इंजिनियर- सर्वव्यापी क्षेत्र !


आपण अनेकविध व्यवसायांची नावं ऐकतो. त्यातील व्यक्तींना भेटतो. त्यातली काही क्षेत्रं आपल्याला भुरळ पाडतात. पण त्या क्षेत्रात नेमकं काय काम असतं, हे जाणून घेण्यासाठी ही मालिका. यांत आपल्याला भेटतील एकेक व्यावसायिक, जे आपल्याला त्यांच्या कामाबद्दल सांगतील. ही मालिका वाचली की, तुम्हांला तुमच्या करिअरचे मार्ग ठरवायला मदत होईल. या भागात वाचा- 'केमिकल इंजिनियर' नक्की काय काम करतात!

आपल्या घरी दररोज दुधाचे विरजण लावून दही बनते. ही झाली घरगुती प्रक्रिया. पण बाजारात तयार पॅकबंद दही सहज मिळते. हे विकतचे दही दाट असते, खात्रीलायक गोड असते. कोणत्याही हवामानात त्याची चव सारखीच लागते. पण घरचे दही असे खात्रीलायक गोड नसते. साधेसे दही जेव्हा कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात करायचे असते, तेव्हा केमिकल इंजिनियरची मदत लागते. कोणत्याही कंपनीला कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन करायचे असते. त्यामुळे कमी प्रमाणात कच्चा माल (Raw Materials) वापरून ग्राहकांना हवेसे वाटेल असे दही बनवायचे असते. मग दही बनवण्याची प्रक्रिया कशी असावी, ती किती प्रमाणात केल्यावर जास्तीत जास्त फायदा होईल, कच्चा माल किती वापरणे योग्य, किती ऊर्जा देणे आवश्यक आहे; हे सारे ठरवणे असते केमिकल इंजिनियरचे काम! तू कधी चहा बनवलायस? हो ना? मग तू केमिकल इंजिनियरिंगची झलक अनुभवलीच आहेस! जेव्हा आपण चहा-पावडर उकळत्या पाण्यात घालतो, तेव्हा चहा- पावडरमधील द्रव्ये उकळत्या पाण्यात मिसळतात, मग गॅसची ज्योत आपल्याला हवी तेवढी ठेवतो. म्हणजेच ऊर्जेवर नियंत्रण ठेवतो. प्रत्येक घराची चहा करण्याची पद्धत वेगवेगळी असते. कोणी साखर आधी घालतात, तर कोणी चहा-पावडर नंत ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शिक्षण , करिअर

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen