अमेरिकेच्या नासाचं ‘अपोलो-११’ चंद्रावर चार दिवसांत पोचलं होतं आणि आपलं ‘चांद्रयान-२’ चंद्रावर पोचायला ४८ दिवस का लागले, ते समजून घेऊया.
हा अंक तुमच्या हात पडेल तेव्हा आपल्या ‘चांद्रयान-२’नं चंद्रावर सोडलेला ‘विक्रम लँडर’ चंद्रावर उतरला असेल आणि त्यातून ‘प्रज्ञान’ ही फिरती गाडी बाहेर पडून आपलं काम करू लागली असेल. त्याबद्दलच्या बातम्याही वृत्तपत्रांत येऊ लागल्या असतील. तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की, अमेरिकेच्या नासाचं ‘अपोलो-११’ चंद्रावर चार दिवसांत पोचलं होतं आणि आपलं ‘चांद्रयान-२’ चंद्रावर पोचायला ४८ दिवस का लागले? हा प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे. त्याचं थोडक्यात उत्तर असं- अवकाशामध्ये प्रदीर्घ प्रवास करून दूरवर जायचं तर दोन गोष्टी आवश्यक असतात. एकतर प्रवासाचा मार्ग अगदी सरळ असला पाहिजे आणि दोन, यानाचा वेग प्रचंड असायला हवा. यानाला प्रचंड गतीने जायचं असेल, तर त्याला आपल्याबरोबर मोठ्या प्रमाणात इंधन घ्यावं लागणार. त्यामुळे यानाचं वजन वाढणार. त्या अवजड वजनाच्या यानाला अवकाशात घेऊन जायचं तर त्यासाठी लागणाऱ्या या रॉकेटची बांधणीही अवाढव्य असली पाहिजे आणि त्या रॉकेटलाही इंधनाची मोठी टाकी असायला हवी. ‘अपोलो-११’ यानाला अवकाशात घेऊन गेलं ते ‘सॅटर्न-५’ हे रॉकेट. त्या रॉकेटची क्षमता तासाला ३९ हजार किमी अंतर कापण्याची होती! शिवाय एकावेळी ४३ टन वजन अवकाशात घेऊन जाण्याची क्षमताही त्याच्याकडे होती. या रॉकेटने अवकाशात झेप घेतल्यानंतर पृथ्वीभोवती एक फेरी मारली. दुसरी फेरी मारतानाच ‘सॅटर्न-५’ या रॉकेटनं, आपल्या तिसऱ्या टप्प्यामध्ये, कमांड मोड्युल आणि ल्युनार मोड्युल यांना चंद्राच्या मार ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .