आपलाही Thanks Giving

वयम्    शुभदा चौकर    2019-10-26 11:00:16   

अमेरिकेत जसा ThanksGiving Day आहे तसा ThanksGiving Day आपल्याकडेही आपण दिवाळीत साजरा करतो. कसा ? वाचा त्यासाठी हे 'वयम्' दिवाळी अंक २०१९ मधील संपादकीय- 

'वयम्' दोस्तांनो दोन महिन्यांपूर्वी ‘वयम्’च्या संपादकीय लेखात मी म्हटले होते की आपण सॉरी आणि थँक यू म्हणण्यात कंजुषी करतो! त्यावेळी एक प्रतिक्रिया आली की, अमेरिकेत जसा ThanksGiving Day आहे, तसा आपल्या देशात नाही, तो आपण साजरा करायला हवा. मनात आले, ThanksGiving Day नसला तरी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देणारे सण आहेत आपल्याकडे. मी आणि माझे कुटुंबीय यांच्या पलीकडे जाऊन सर्वांचे आभार मानण्याच्या पद्धती सर्व संस्कृतींत आहेत. आपल्याकडे दिवाळीला आपण केवळ घरातच नाही तर दारात, आवारात पणत्या, आकाशकंदील लावतो, रांगोळ्या काढतो. का, तर आपल्या घरातला आनंद आणि प्रकाश इतरांपर्यंत पोचावा, सर्वत्र पसरावा. आपले जीवन आपल्या भोवतालाशी जोडलेले असते. त्या भोवतालाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण परिसर  पणत्यांनी व रांगोळ्यांनी सजवतो. आपण दिवाळीला नवे कपडे घालतो, फराळाचा आनंद लुटतो, सुट्टीचा आनंद उपभोगतो. पण दिवाळीतील ThanksGiving ची भावना जरा अधिक जाणीवपूर्वक समजून घेतली की दिवाळीचे निमित्त साधून आपण ThanksGiving साजरे करू शकू. बघा, पटतंय का! दिवाळीचा प्रत्येक दिवस एकेका घटकाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा आहे. वसुबारसच्या दिवशी गाई-म्हशींची पूजा करायची पद्धत आपल्याकडे आहे, आजही ती गावाकडे पाळली जाते. ही मुकी जनावरे आपल्याला नेमाने दूध देतात, त्यांचे कोडकौतुक करून त्यांना Thank You म्हटले जाते या दिवशी. इतकेच काय, पूर्वी केरसुणीची पूजा केली जायची, त्या दिवशी ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen