दिवाळीचा फराळ करताना ‘सर्वच गोष्टी कशा जमून यायला लागतात’ हे ब्रीदवाक्य आई-आजी म्हणतात. हे ‘जमून येणं’ म्हणजे विज्ञान! ते समजून घेऊया-
दिवाळीत रोजच्या पोळीभाजी-आमटीपासून सुटका मिळते ती दिवाळीच्या फराळामुळे. चकली, करंजी, चिवडा आणि लाडू हे दिवाळीचे मुख्य पदार्थ. त्यांच्या जोडीला चिरोटे, शंकरपाळी, कडबोळी, साटोऱ्या, शेव, अनारसे असे अनेक! फराळाचे हे पदार्थ ज्याने कोणी शोधून काढले असतील, त्यांचं खूप कौतुक वाटतं. कसं काय बुवा त्यांच्या मनात आलं असेल की, असे असे पदार्थ केले की ते झकास होतील? हे पदार्थ करतानाही खास कसब वापरण्याची आवश्यकता लागते. चक्क विज्ञान वापरून प्रत्येक पदार्थाची रीत ठरवली गेली आहे. चकलीचं पीठ, ज्याला भाजणी म्हणतात, ते तयार करण्यात जसं कौशल्य आहे, त्याप्रमाणेच ते मळून, तळण्यातही! ‘सर्वच गोष्टी कशा जमून यायला लागतात’ हे माझ्या आजीचं ब्रीदवाक्य असे. हे ‘जमून येणं’ म्हणजे काय तेच पाहूया. फराळाचे पदार्थ बनवताना त्यातल्या प्रत्येक छोटय़ा छोटय़ा कृतीला फार महत्त्व असतं, शिवाय ‘पेशन्स’ही लागतो! चकलीची भाजणी करताना प्रत्येक गोष्ट नीट भाजली गेली नाही, तर चकली चिवट, मऊ बनते. जास्त भाजल्या गेलेल्या डाळींमुळे तर चकली एवढी ठिसूळ बनते की, तळतानाच चकलीचे तुकडे पडतात; शिवाय कधीकधी कडवट चवही येते, तर कधी करपट वास येत राहतो. भाजणीचं प्रमाणही फार महत्त्वाचं असतं. जेवढे तांदूळ, त्याच्या निम्मी चण्याची डाळ; आणि जेवढी चणा डाळ, त्याच्या निम्मी उडदाची डाळ. थोडे थोडे धने आणि जिरं हे चवीसाठी. हे सारं वेगवेगळं भाजून घ्यायचं, मग एकत्र करायचं आणि दळायचं, की झाली चकलीची भाजणी! पाहा हं, डाळींमध्ये एक अंगभूत चिकटपणा असतो. तांदळ ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Meenalogale
6 वर्षांपूर्वीलेख फर्मास जमला आहे.दोन्ही नजाकतीचे पदार्थ आहेत.
vilasrose
6 वर्षांपूर्वीहा लेख खूपच आवडला.दिवाळी फराळ बनवतांना स्त्रिया खूपच मेहनत घेतात.