अवघ्या चारेक वर्षांपूर्वी विकी कौशलचा उल्लेख आल्यास 'हा कोण?' असा प्रश्न सहजच मनात यायचा. मनाशी ठोकताळे निर्माण होत- विकी फिल्मी फॅमिलीशी कनेक्टेड नसावा, नाहीतर त्याच्याविषयी कधीतरी, कुठेतरी ऐकायला मिळालं गेलं असतं. विकीचं नाव कधी कुठल्याही गॉसिपशी निगडित नव्हतं, त्यामुळे हा पठ्ठा तसा चर्चेत नसे ! विकी कौशलचा अभिनय असलेला 'मसान' हा त्याचा पहिला कमर्शिअल सिनेमा २०१५ मध्ये प्रदर्शित झाला आणि अनेक फिल्म फेस्टिवल्समध्ये त्या सिनेमाला स्टँडिंग ओव्हेशन मिळाले. त्यांनंतर आलेल्या 'रामन-राघवन' 'संजू ' 'राजी' आणि 'उरी- द-सर्जिकल स्ट्राईक' अशा प्रत्येक सिनेमानिशी विकी कौशलचे नाव जगात प्रसिद्ध झाले. नुकताच ह्या अभिनेत्याला 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आणि विकी कौशल या अभिनेत्याचा स्टारडमकडे प्रवास सुरू झाला.
२०१९ आणि २०२०मध्ये विकीचे अनेक मोठे चित्रपट रिलीज होताहेत. फिल्मी तरीही नॉन फिल्मी कुटुंबात वाढलेल्या विकी कौशलचा प्रवास अतिशय थक्क करणारा आणि तितकाच प्रेरणादायी आहे. ‘वयम’साठी त्याच्याशी गप्पा मारताना अतिशय विनम्र, निगर्वी विकी भेटला.. आपलासा वाटला..
‘वयम’च्या मुलांसाठी त्याने कथन केलेले त्याचे हे मनोगत-
माझा जन्म १६ मे १९८८ या दिवशी मुंबईत झाला. माझे वडील प्रसिद्ध अॅक्शन डायरेक्टर शाम कौशल, आई वीणा कौशल आणि माझा धाकटा भाऊ सनी कौशल असं आमचं कुटुंब! आमचे दादा-दादी (वडिलांचे आई-वडील) पंजाबला राहात असत. त्यांना भेटण्यासाठी माझ्या वडि ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .