डास-डासी आणि त्यांच्या दोन जुळ्या मुली डासुली, डुसुली. डासुली, डुसुली अशक्त होत्या. त्यांच्या वयाच्या बाकीच्या मुली मस्त रक्त शोषू लागल्या तरी या आपल्या गटाराच्या पाण्यात फक्त सोंड बुचकळत असत. शेवटी त्यांच्या आईने ‘घरगुती गटारी’ उपचार केले. सोंड खुपसून रक्त शोषायला शिकवले... मग त्या मस्त लाईफ एन्जॉय करू लागल्या!
एका गावात डास आणि त्याची बायको डासी राहात होते. त्यांना दोन जुळ्या मुली झाल्या. मग आई-बाबांनी त्यांच्या दोन छोट्या जुळ्या मुलींची नावं ठेवली डासुली आणि डुसुली. डासुली, डुसुली मोठ्या होऊ लागल्या, पण त्यांची तब्येत काही सुधरेना. काही न काही कारणाने त्यांचं आजारपण सुरूच. सर्दी, खोकला आणि शेंबडी सोंड. त्यामुळे त्या गूंगूं करायच्या कमी आणि गॅंगॅं मॅंगॅं शिंकायच्या जास्ती. डासुली, डुसुलीला जेवणही जाईना. त्या दिवसेंदिवस अशक्त होऊ लागल्या. आई बाबांना कळेना आता काय करावं. कारण त्यांच्या वयाच्या बाकीच्या मुली मस्त रक्त शोषत, गाणी गुणगुणत फिरत असत. तर या दोघी गटाराच्या पाण्यात फक्त सोंड बुचकळत असत. डास बाबा म्हणाले, “आपण यांना कुठल्यातरी स्पेशालिस्टला दाखवूया. औषधाचे दोन डोस पडले तर फरक पडेल गं...” सोंड हलवत डासी म्हणाली, “नको. नको. मी पाहते काही ‘घरगुती गटारी’ उपचार करून. इतक्या लहान वयात त्यांना डॉक्टरची सवय नको लागायला.” डासुली, डुसूलीला प्रेमाने पंखाळत, मायेने सोंडाळत आई म्हणाली, “चला आज आपण सारे जेवायला बाहेर जाऊ. थोडा चेंज हवाच. मी तुम्हांला नवीन गटारं दाखवते. वेगवेगळे प्राणी दाखवते. मग तुम्ही एन्जॉय कराल..” आईला पुढे बोलू न देता डासुली म्हणाली, “पण आई, आम्हांला किनई त्या अनोळखी ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .