चीनमधील मातीचं सैन्य

वयम्    मेधा आलकरी    2019-11-11 11:00:49   

आपला शेजारी असलेल्या चीन देशात पर्यटकांना भावणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत.  प्राचीन इतिहास आहे, आधुनिक इमारती आहेत, जागतिक आश्चर्य आहेत, पुरातन वास्तू आहेत, निसर्गसौंदर्य आहे, खाण्यापिण्याची रेलचेल आहे. पण या सगळ्यात मला अचंबित करून गेले ते टेराकोटा मातीचे योद्धे. मातीचे योद्धे म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर वाळूच्या किल्ल्यांवर आपण सजवतो ते खेळण्यातले सैनिक तर नाही ना आले? हे पुतळे छोटे छोटे नसून चांगले मोठ्ठे सहा - साडेसहा फूट उंचीचे आहेत. म्हणजे अमिताभ बच्चनपेक्षा उंच! ओल्या मातीचे हे पुतळे आधी वाळवून मग गरम भट्टीमध्ये भाजल्यामुळे, त्याची माती चांगली कडक होऊन ते मजबूत झाले आहेत. वाचा या मातीच्या सैन्याविषयी-   १९७४ साली काही शेतकरी आपल्या शेतात विहीर खणत होते. त्यावेळी त्यांना या २२०० वर्ष पुरातन खजिन्याचा शोध लागला. खणताना त्यांना मातीच्या जवानांचे पुतळे आणि त्यांचे काही अवशेष सापडले. त्यांनी लगेच त्याची नोंद सरकारी अधिकाऱ्यांकडे केली. लगेचच पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी उत्खननाला सुरुवात केली आणि सतत पाच वर्षं खपून त्यांनी हा खजिना बाहेर काढला. कोणी बनवले होते हे एवढे मोठे पुतळे आणि कशासाठी? -सम्राट चिंग या चीनच्या पहिल्या सम्राटाने आपल्या थडग्यात मृत्यूनंतरच्या प्रवासात सोबत व संरक्षण करण्यासाठी सहा हजार मातीचे पुतळे बनवले होते; नुसते योद्धेच नाही तर पूर्ण सैन्यच! शस्त्र, अस्त्र, घोडदळ, पायदळ, लाकडी रथ, ब्रॉन्झचे रथ. सैन्यात सामान्य सैनिकांबरोबरच काही सेनापती, तर काही तिरंदाज. या सम्राट चिंगला वाटायचं की, आपण अमर राहावं. अटळ असणारा मृत्यू टाळता येईल का, याचा शोध घेण्यासाठी त्याने आयुष्यभर प्रयत्न केला. अशा कुठल्यातरी अजब अमृताच्या शोध ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


माहिती , वयम , मेधा आलकरी

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen