स्पर्धा आणि तुलना होणारच!


आज अनेक क्षेत्रांत स्पर्धा आहे. तुम्हांला स्पर्धेचा सामना करावा लागतो. कुठलंही अपयश किंवा तुलना ही तुमच्या खाजगी व्यक्तिमत्त्वाला लावून घेतली नाहीत, तर तुम्ही स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने ग्रुम करू शकता.  माझा अमुक एक निर्णय चुकला होता, पण मी त्यातून हे शिकले/शिकलो, हे जर तुम्हांला कळलं तर त्यासारखी चांगली गोष्ट नाही, मित्रांनो.

आई शिक्षिका, वडिलांना वाचनाची आवड, भाऊ नाटकात कामं करायचा असं पोषक वातावरण असलेल्या घरात मी लहानाची मोठी झाले. चांगली पुस्तकं, चांगलं साहित्य घरी नेहमी आणलं जायचं आणि वाचलं जायचं. वाचून त्यावर चर्चा केली जायची.  शाळेत मी अभ्यासात हुशार होते.  मुळात अभ्यास मला आवडायचा,  त्यामुळे मी तो मनापासून करायचे. आई-वडिलांना माझ्या अभ्यासाची कधी चिंता नव्हती. ‘अभ्यास करता करता तू या क्षेत्रात कशी आलीस,’ असं मला सगळेजण नेहमी विचारतात. या क्षेत्रात यायचा निर्णय जरी माझा असला तरी माझ्यातला हा गुण आई-बाबा आणि दादाने सगळ्यात आधी ओळखला होता. त्याचं झालं असं की, दहावीची परीक्षा दिल्यानंतर मी राज्य नाट्यस्पर्धेसाठी एका नाटकात काम केलं होतं. ते काम मी चांगलं केलं, मला त्यात बक्षीस मिळालं, सगळ्यांनी कौतुक केलं, वगैरे वगैरे! तोपर्यंत माझा नाटक, अभिनय या विषयाशी काहीच संबंध नव्हता. मी माझ्या अभ्यासात असायचे. दहावीची परीक्षा झाल्यावर चांगली दोन-अडीच महिन्यांची मोठी सुट्टी होती म्हणून खरंतर मी त्या नाटकात काम केलं होतं. एके दिवशी आईला मी म्हटलं, ‘आत्तापर्यंतच्या सगळ्या सुट्ट्यांमध्ये माझी ही सुट्टी सर्वात बेस्ट होती. या सुट्टीत मला खरंच खूप मजा आली.’ मग आईने विचारलं, “कशामुळे तुला असं वाटतंय?’ मी सांगितलं की,  ‘”न ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अनुभव कथन , व्यक्तिमत्व विकास , करिअर

प्रतिक्रिया

  1. avthite

      3 वर्षांपूर्वी

    एकदम सॉल्लिड ??वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen