रिझल्ट म्हटला की सगळ्यांनाच एक प्रकारे धास्ती असते... हुशार मुलांना टक्क्यांची काळजी, काठावर पास होणाऱ्यांना नापास होण्याची भीती... यावेळी मनाची होणारी घालमेल ज्याची त्यालाच कळते.. रोहितच्या बाबतीतही असंच काहीतरी घडतंय... तेही रिझल्टच्या बाबतीत.
प्रगतिपुस्तक हातात पडायच्या कितीतरी आधीच रिझल्ट काय लागणार, याची रोहितला पूर्ण कल्पना होती. म्हणजे सगळ्या विषयांचा नाही, फक्त फिजिक्सचा, आणि तोही वर्षभराचा नाही, फक्त या युनिट टेस्टपुरता. कारण सोपं होतं. प्रश्नपत्रिका पाहिल्याच क्षणी रोहितच्या लक्षात आलं होतं, की यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर त्याला येत नव्हतं. रोहितचं हे नववीचं वर्षं होतं. अभ्यासाचा ताण वाढायला लागला होता. म्हणजे रोहितवरचा नाही, त्याच्या आईवरचा. रोहितवरचा ताण कधी वाढतबिढत नसे. रोहितला आपण अभ्यासात कुठे आहोत, हे नक्की माहीत होतं. आपण मेडीकलला वगैरे जाऊ अशा त्याच्या भव्य कल्पना नव्हत्या ( आणि इथे डाॅक्टर व्हायचं होतं कोणाला ? सतत आजारी लोक, त्यांच्या तोंडाबिंडात हात घालायचे, आणि रक्त, ग्रोस!), आणि आपण दहावीनंतर काय करायचं हे सुद्धा त्याने धड ठरवलं नव्हतं, पण आपण ढ विद्यार्थी नाही, याची रोहितला खात्री होती. त्याची आई त्याला तिच्या ओळखीतल्या, नात्यातल्या सगळ्या त्याच्या वयाच्या मुलांबरोबर कम्पेअर करुन तो कसा पुरेसा अभ्यास करत नाहीये हे सांगत असे, पण तिच्याकडे दुर्लक्ष कसं करायचं याची रोहितला एव्हाना सवय झाली होती. रोहित ना त्यातला होता, ना यातला. सत्त्याण्णवाचे अठ्ठ्याण्णव टक्के होण्याची चिंताही त्याला नव्हती, आणि चौतीसाचे पस्तीस टक्के कसे करावे याची काळजीही त्याला वाटत नव्हती .तो आपला पंचाहत्तर ऐशीच् ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Rajeshvaze
5 वर्षांपूर्वीफारच छान कथा..
shripad
6 वर्षांपूर्वीसुंदर कथा आहे. अजून लिहा.
Meenalogale
6 वर्षांपूर्वीकथा आवडली,शेवटची कलाटणी आवडली.