स्क्रीनरायटर- पडद्यामागचे हिरो   

वयम्    जालिंदर कुंभार    2019-12-17 10:45:58   

वा! काय मस्त चित्रपट आहे. पटकथा आणि संवाद तर अप्रतिम... असं आपण अनेकांच्या तोंडून ऐकतो किंवा स्वतःही चित्रपट, मालिका बघितल्यावर म्हणतो. पण नुसती गोष्ट लिहिणं म्हणजे स्क्रिप्ट रायटिंग का ? किंवा संवाद लेखन म्हणजे स्क्रिप्ट रायटिंग का ? असा गोंधळ बऱ्याचदा पाहायला मिळतो. मग स्क्रिप्ट रायटिंग म्हणजे नक्की काय त्यात करियर करायचं तर कोणत्या गोष्टी याव्या लागतात.. याबद्दल योग्यरित्या समजावून सांगितलंय स्क्रिप्ट रायटर जालिंदर कुंभार यांनी. वाचा स्क्रिप्ट रायटिंग विषयी-

मित्रांनो आपण बघतो की, एखाद्या सिनेमातील हिरोचे बाबा हिरोचा हात धरून त्याला घराबाहेर ढकलून देतात आणि घराचं दार आतून लावून घेतात. हिरो बाहेर भर पावसात भिजतोय आणि रडतोय. त्याच्या चेहऱ्यावरून ओघळणारं पावसाचं पाणी आणि डोळ्यांतून वाहणारे अश्रू एकमेकांत मिसळतायत. तुमच्यापैकी किती जणांना माहीत आहे की, हे जे तुम्ही सिनेमात बघत असता ते सर्वप्रथम कुणीतरी कुठेतरी पद्धतशीरपणे कागदावर लिहून ठेवलेलं असतं? ते जे काही कागदावर लिहिलं जातं, त्याला सिनेमाच्या/ मालिकेच्या भाषेत एखाद्या संहितेतील (Script) 'दृश्य' म्हणजेच 'Scene' (सीन) असं म्हणतात. आणि तो दृश्य लिहिलेला कागद घेऊनच सिनेमाचा दिग्दर्शक, कॅमेरामन, मेकअपमन, कलादिग्दर्शक, ध्वनिलेखक आणि मुख्य म्हणजे नट आपापलं काम काटेकोरपणे करत असतात. त्या लिखित शब्दांना 'दृकश्राव्य' माध्यमातून न्याय (Justify) द्यायचा प्रयत्न करत असतात. सिनेमा, मालिका किंवा वेबसिरीजसाठी 'संहिता' (Script)  लिहिणाऱ्यांना स्क्रिन / स्क्रिप्टरायटर असं म्हणतात. स्क्रीन म्हणजे पडदा- छोटा, मोठा, थिएटरमधला, टीव्हीचा, मोबाईलचा. संहितेचे मुख्यत: चार भाग पडतात-

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


भाषा , करिअर

प्रतिक्रिया

  1. purnanand

      6 वर्षांपूर्वी

    खूप छान आणि वेगळ्या क्षेत्रातील माहिती.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen