अंटार्क्टिकावर दिवाळी-दसरा


‘मैत्री’ स्थानकामधील पोटमाळ्यावर एका लहानशा खोलीत देवालय आहे. हिंदू, ख्रिस्ती, शीख, बौद्ध, मुस्लिम वगैरे सगळ्या धर्मांचे मिळून हे एकच प्रार्थनास्थान आहे. या देवालयात गीता, बायबल, कुराण, गुरू ग्रंथसाहेब वगैरे धार्मिक ग्रंथ अगदी बाजूबाजूला विराजमान आहेत! तिथे सर्व वाद्ये ठेवलेली आहेत- हार्मोनियम, तबला, बासरी, म्रुदंग, झांजा, गिटार आणि डफलीसुद्धा!

आता सुमारे एक वर्षासाठी अंटार्क्टिकातील ‘मैत्री’ हे भारतीय संशोधन केंद्र माझे घर आणि तेथील सदस्य माझे कुटुंबीय झाले. ‘मैत्री’मधील सदस्यांमध्ये शास्त्रज्ञ आणि लॉजिस्टीक सांभाळणाऱ्या (शास्त्रज्ञांना मदत व केंद्राची देखभाल करणाऱ्या) मंडळींचा समावेश असतो. अंटार्क्टिकातील त्या बर्फाच्छादित निर्जन भूमीवर आमचे एकमेव शेजारी होते ते रशियन संशोधन केंद्र ‘नोव्हो’ येथील ३० सदस्य! ‘मैत्री’मध्ये हिवाळ्यात २५ सदस्य राहण्याची सोय आहे. घरापासूनच नाही तर सामाजिक जीवनापासून दूर विजनवासात राहून ‘मैत्री’वर काम करताना आम्ही सण आणि उत्सव साजरे करायचो.  १३ जानेवारीला मी पोहोचल्यावर झालेल्या आमच्या स्वागत समारंभानंतर साजरी झाली ती मकरसंक्रांत! तिळगुळाची देवाणघेवाण करून एकमेकांबरोबर आपुलकीचे नातेसंबंध दृढ करणारा दिवस! ‘मैत्री’मध्ये तर मला त्याचे आगळेच महत्त्व वाटले! भारतातील वेगवेगळ्या प्रदेशातून आलेले आणि एकमेकांची फारशी ओळख नसलेले सगळे सदस्य आता जणू मायेच्या बंधांनी जोडले गेले! होळीच्या दिवशी मी सर्व ‘मैत्री’वासियांसाठी, आमच्या स्वयंपाकी मित्राच्या मदतीने चक्क पुरणपोळ्या केल्या! काही जणांनी तर प्रथमच पुरणपोळी खाल्ली! आपले हे खास महाराष्ट्रीयन पक्वान्न सगळ्यांना खूपच आवडले. अंटार्क्टिकात आग लागण्याचा खूप धोका असतो. थंड व कोरड्या ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अनुभव कथन , बालसाहित्य , स्थल विशेष

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen