जे जे उत्तम, उदात्त, उन्नत... 

वयम्    शुभदा चौकर    2020-02-04 09:00:33   

मोर्चे, आंदोलने, नासधूस... अशा बातम्यांच्या गर्दीत ‘माणुसकीसमोर आव्हाने उभी करणारी परिस्थिती’  निर्माण झाली आहे. आपणच गोंधळलोय, तर बहरत्या वयातील मुले किती गोंधळात पडली असतील? मग ही अस्वस्थता दूर करण्यासाठी काय करावे? 

  वयम् दोस्तांनो, गेल्या महिन्यात तुमच्याशी संवाद साधताना मनात एक शंका होती की, आजूबाजूच्या वातावरणातील गोंधळाबद्दल लिहितोय खरे आपण, पण अंक प्रसिद्ध होऊन तो तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत, विरेल तो सारा आक्रस्ताळेपणा, असे वाटले होते. पण आता पुढच्या अंकातून संवाद साधायची वेळ आली तरी, त्यावेळी आपण बोललो होतो ती ‘माणुसकीसमोर आव्हाने उभी करणारी परिस्थिती’ अजूनही तशीच आहे. तुम्ही गोंधळून गेलात तर नवल काय? मीही गोंधळले आहे. मग ही अस्वस्थता दूर करण्यासाठी काय केले या मधल्या काळात? तर आपल्या देशाच्या जडणघडणीसाठी आयुष्य वेचलेल्या काही उदात्त व्यक्तिमत्त्वांचे विचार ऐकले व वाचले. आपले सर्वांचे लाडके ‘वयम्’ मित्र डॉ. आनंद नाडकर्णी यांचे लोकमान्य टिळक यांच्यावरील भाषण ऐकले. अत्यंत विद्वान असलेल्या टिळकांनी, देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वत: केलेला त्याग, ध्येय गाठण्यासाठी केलेले नियोजन, लोकांना प्रेरणा देण्यासाठी योजलेल्या कल्पना, त्यांच्या प्रत्येक तत्त्वाचा विचारपूर्वक अंगीकार असे लोकमान्यांचे विविध पैलू डॉ. नाडकर्णी यांनी सविस्तर व सुसंगतपणे उलगडून दाखवले. ज्येष्ठ लेखक अंबरीश मिश्र यांचा ‘गांधीजी @१५०’ हा कार्यक्रम अनुभवला. गांधीजींच्या १५०व्या जन्मशताब्दीनिमित्त महात्मा गांधीजींचे विचार आपण आपल्या मनात रुजवले आणि जीवनात अंगिक ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


वयम् - संपादकीय

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen