डॉ. अभिजित बॅनर्जी या मूळ भारतीय अर्थशास्त्रज्ञाला नोबेल पारितोषिक घेताना पाहिले असेल तुम्ही टीव्हीवर किंवा वृत्तपत्रात! भारी वाटते ना, अशा बातम्या वाचताना! त्यांचे काम मोठे आहे; त्यातील मुलांच्या शिकण्याशी निगडित त्यांच्या कामाची ओळख आपण करून घेऊया.
“गरिबी नष्ट करण्यासाठी करावी लागणारी लढाई एखाद्या भयंकर रोगाशी लढण्यासारखी आहे. ही लढाई एक मोठे युद्ध करून जिंकता येणार नाही तर त्यासाठी छोटी छोटी युद्धे जिंकावी लागतील.” असे म्हणणे आहे अलीकडेच ज्यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे त्या त्रिमूर्तींचे– डॉ. अभिजित बँनर्जी, डॉ. एस्थर डुफ्लो आणि डॉ. मायकेल क्रेमर यांचे. या तिघांपैकी डॉ. अभिजित बँनर्जी हे भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ आहेत आणि डॉ. एस्थर डुफ्लो त्यांच्या पत्नी आहेत. गरिबी नष्ट करण्यासाठी वर नमूद केलेल्या छोट्या छोट्या लढाया कोणत्या? - या लढाया आहेत- पहिली, बेरोजगारी विरोधातील, दुसरी, उत्तम आरोग्य सेवा रंजल्या गांजलेल्या लोकांना मिळवून देण्यासाठी आणि तिसरी लढाई असेल, शाळेत न जाऊ शकणाऱ्या, मध्येच शाळा सोडणाऱ्या, शिकू न शकलेल्या लहान गरीब मुलांसाठीची. जर या प्रश्नांवर आपण मात केली तर मोठ्या प्रमाणावर आपल्याला आपल्या अवतीभवती जी असमानता दिसते ती कमी होईल यावर या तिघांचा विश्वास आहे. जगभरातील विचारवंत, शास्त्रज्ञ, अर्थतज्ज्ञ, राजकारणी लोक दारिद्र्य निर्मूलनाच्या प्रश्नांवर सातत्याने उपाययोजना करीत असतात आणि त्यासाठी लागणाऱ्या पैशांची जुळवाजुळव करीत असतात. परंतु, या प्रयत्नांना म्हणावे तर यश मिळत आहे असे दिसत नाही. डॉ. बॅनर्जी आणि त्यांच्या सहकार्यांनी यासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण अशी पद ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .