थंडीत अंगावर काटा का येतो? शिरशिरी का येते ? यात काय गौडबंगाल आहे ?
नवं वर्ष गुलाबी थंडी घेऊन आलं आहे. पहाटे शाळेत जाताना स्वेटर घातला नाही तर मस्त शिरशिरी येते, अंगावर काटा उभा राहातो! ती शिरशिरी, तो काटा – हे काय गौडबंगाल आहे? आपण, तसेच उंदीर-घुशी, गुरं-ढोरं, वाघ-सिंह वगैरे बाकीचे सस्तन प्राणी आणि पक्षी हे सारे ऊबदार रक्तवाले प्राणी! बाहेर जोराची थंडी असो, की जीवघेणा उकाडा – आपल्या शरीराचं तापमान स्थिर राहातं. कुडकुडणं हा त्या स्थैर्याचा भाग आहे. रेफ्रिजरेटरला जसं थर्मोस्टॅट असतं, तसंच आपल्या मेंदूच्या बुडाशी आपल्या शरीराचं थर्मोस्टॅट असतं. त्याच्यामुळे आपल्या ऊबदार शरीराचं तापमान नेहमी साधारण ३७० सेंटिग्रेडच्या आसपास राहातं. थंडी वाढली की त्वचेतले मज्जातंतू ती खबर थर्मोस्टॅटला पोहोचवतात. शिवाय थंडीने रक्ताचंही तापमान घटतं. तेही थर्मोस्टॅटला जाणवतं. ते इतर केंद्रांशी संधान साधतं. तिथून स्नायूंना कामाला लागायचा हुकूम मिळतो. सगळे स्नायू आकुंचन-प्रसरणाची कवायत करायला लागतात; म्हणजेच शिरशिरी येते. त्याचवेळी त्वचेवरच्या केसांच्या बुडाशी असलेले स्नायूही आखडतात. त्यामुळे सगळी लव ताठ उभी राहाते, काटा येतो. त्या ताठरलेल्या केसांच्या जाळ्यात हवेचा एक ऊबदार थर अडकून राहातो. त्याची नैसर्गिक दुलईच बनते. थंडी अधिक असली तर स्नायूंची कवायत फार जोरात चालते, कुडकुडायला होतं. त्या व्यायामामुळे शरीरात उष्णता निर्माण होते आणि तापमान पुन्हा ३७० सेंटिग्रेडच्या आसपास पोहोचतं. बहुतेक वेळा, एकदाच छान कुडकुडून घेतलं की मस्त ऊब येते, आणि थंडी पळून जाते. ताप येतानाही थंडी भरते! जेव्हा जंतूंचा संसर्ग होतो तेव्हा त्यांच्याशी झुंज ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .