मातृभाषा ही आपली पहिली भाषा असते. मातृभाषा म्हणजेच आपलं आपल्या भावनांशी नातं; म्हणूनच मातृभाषेशी असलेलं नातं आपण जपायला हवं. आपण कोणत्याही भाषेत शिकत असलो, तरी मातृभाषेतून बोलणं, वाचणं, लिहिणं करत राहावं. आपलं आपल्या मातृभाषेशी फार सखोल नातं असतं; ते तोडू नये. २१ फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून साजरा झाला त्यानिमित्त-
Emotional thinking is our true first language.- फ्रॅंक निनिवगी. किती खरं आहे हे वाक्य. फ्रॅंक यांनी ‘भावना’ या विषयावर खूप अभ्यास केला आहे. ते म्हणतात, भावनिकदृष्ट्या आपण जे विचार करतो, तीच आपली पहिली भाषा असते. म्हणूनच मातृभाषा ही आपली पहिली भाषा असते. मातृभाषा म्हणजे नक्की काय? आपण आईच्या पोटात असतो तेव्हापासून आई जी भाषा बोलत असते, ती आपण ऐकतो. तीच आपली मातृभाषा. आईचा आवाज बाळाला स्पष्ट ऐकू येत असतो आणि इतरांचे आवाज जरा लांबून बोलल्यासारखे, अस्पष्ट ऐकू येत असतात. त्यामुळे आईचा आवाज बाळ मस्तपैकी ऐकत असते. मातृभाषेची सुरुवात होते ती अशी, जन्माच्या आधीपासूनच! मातृभाषेचं अनौपचारिक आणि सहज शिक्षण असं सुरू होतं. बाळ जन्माला आल्यावर त्याला इतरांचे आवाजही स्पष्टपणे ऐकू येतात. घरात बोलली जाणारी भाषा ते बाळ अगदी सहजपणे शिकतं. जी मुलं नॉर्मल असतात, म्हणजे ज्यांच्या मेंदूत कोणतीही गुंतागुंतीची समस्या नसते, ती मुलं जन्मल्यापासून ते पहिल्या दोन वर्षांत, घरात बोलली जाणारी किमान एक भाषा पूर्णपणे बोलायला शिकतात. अगदी त्यातलं व्याकरण, विशिष्ट उच्चार शिकतात. उदा. जपानी भाषेत ‘ल’ आणि ‘र’ मध्ये फरक केला जात नाही. त्यामुळे मोठं झाल्यावरही जपानी लोकांना ‘ल’ आणि ‘र’ या दोन उच्चार ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
rsrajurkar
5 वर्षांपूर्वीखूप छान माहिती.