बाराव्या शतकात देवगिरीचा राजा रामदेवराय याच्या काळात महाराष्ट्रात असंख्य देवळं तसेच किल्ल्यांची निर्मिती झाली, त्यात दुर्गभांडार हा किल्ला बांधला गेला. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि पेशव्यांच्या काळात अशा किल्ल्यांना बळकटी मिळाली. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या डोक्यावर असलेला हा मजबूत किल्ला! त्रंबकेश्वरचा ‘दुर्गभांडार’ पाहायचाच, असा निर्णय घेऊन रात्री १२ वाजता ठाणे स्थानकावर सातजण भेटलो. उत्तरेकडे पाऊस झाल्यामुळे आपल्याकडे चांगलाच गारठा होता. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ अशा आवेशात आम्ही रात्रीची शेवटची कसारा गाडी पकडली. आम्हां सात वीरांमध्ये एक स्त्री होती. सकाळी सव्वापाचच्या सुमारास आम्ही त्रंबकेश्वर मंदिराच्या समोर पोहोचलो. मंदिर सकाळी सहाला उघडते, तरी सोमवार असल्यामुळे पहाटेपासूनच त्या थंडीत शिवभक्तगण रांग लावून मंदिर उघडण्याची प्रतीक्षा करीत होते. आम्हांला देवळाच्या बरोब्बर मागे ब्रह्मगिरीचा विशाल डोंगर दिसत होता. पौर्णिमा असल्यामुळे पूर्ण चंद्राच्या प्रकाशात त्याची भव्यता आणि राकटपण जाणवत होते. आम्ही त्रंबकेश्वराला बाहेरूनच नमस्कार करून पुढे ‘दुर्गभांडार’च्या दिशेने चालायला सुरुवात केली. वाटेत कुशावर्त तलाव पाहून पुढे निघालो. त्या थंडीतही काही भक्त कुशावर्त तलावात स्नान करीत होते. पुढे गंगासागर तलाव ओलांडून आम्ही एम.टी.डी.सी.च्या हॉलिडे रिसॉर्टवरून ब्रह्मगिरीच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. पायऱ्या म्हटले की, कुठल्याही गिर्यारोहकाचा जरा हिरमोडच होतो, पण या पायऱ्या लहान उंचीच्या आणि जवळजवळ असल्याने त्रास जाणवत नव्हता. सूर्योदयाच्या आगमनाची वाट पाहणाऱ्या आभाळाचा रंग आणि पिवळ्या-लाल दिव्यांनी उजळून ग ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Mannishalohokare
5 वर्षांपूर्वीशब्दातीत , प्रत्यक्ष दुर्ग उभा राहिला डोळ्यासमोर , असे अनेक निसर्गाचे चमत्कार आपल्या महाराष्ट्रात आहेत ते आपण जतन करायला हवे