वेधशाळेत आम्ही !


23 मार्च हा जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो.  त्यानिमित्ताने- हवामान, तापमान, आर्द्रता या गोष्टी कशा मोजतात, हे समजून घेण्यासाठी 'वयम्' वाचकांनी दिलेली ही क्षेत्रभेट-

पावसाचे दिवस असोत, वा थंडी किंवा कडाक्याचा उन्हाळा, वृत्तपत्रात बातम्यांमध्ये कायम वाचायला आणि बघायला मिळतं ते आजचं तापमान आणि हवामानाची स्थिती. पावसाच्या काळात तर हवामानाचा अंदाज बघून लोक कामासाठी बाहेर पडतात. आठवडाभर मुसळधार पावसाचा इशारा दिला की, अनेकदा मुसळधार पाऊस पडतोच असं नाही. त्यामुळे हवामान खात्याने भाकीत केलं म्हणजे त्याच्या उलटच होणार, असं मोठे लोक गमतीने म्हणताना दिसतात. परंतु शहरातील हवामानावर प्रत्येक मिनिटाला करडी नजर ठेवणाऱ्या या हवामान खात्याचे अंदाज का बरं चुकतात? या हवामान खात्याचं कामकाज कसं चालतं? तापमान (Temperature), आर्द्रता (Humidity) कसे मोजत असतील? असे अनेक प्रश्नरूपी ढग आमच्या मनात बरसत होते. हे सारे प्रश्न घेऊन आम्ही ‘भारत सरकार प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्र- कुलाबा, मुंबई’ इथे गेलो. २३ मार्च हा जागतिक हवामान दिन. या निमित्ताने ‘वयम्’ने हवामान खात्याचं कामकाज समजून घेणारी क्षेत्रभेट आयोजित केली होती. त्याचा लाभ आम्हां ‘वयम्’च्या वाचकांना मिळाला. कुलाबा येथील हवामान खात्याचा परिसर निसर्गसंपन्न आणि विस्तीर्ण होता. तो बघत बघत आम्ही ‘निरीक्षण क्षेत्र’ भागात (surface observatory) पोहोचलो. तेथील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हवामान खातं दोन प्रकारे नोंदी ठेवतं- प्रत्यक्ष नोंदी आणि स्वयंचलित नोंदी. प्रत्यक्ष नोंदीमध्ये हवामान खात्याचे कर्मचारी दर तीन तासांनी प्रत्यक्ष तिथे जाऊन कमाल आणि किमान तापमान, आर्द्रता, वाऱ्यांची ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शिक्षण , पर्यावरण , विज्ञान- तंत्रज्ञान

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen